वनरक्षक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वनरक्षक हा वनाचे संरक्षण करणारा राज्य प्रशासनाचा कर्मचारी आहे. साधारणत: १० ते १२ गावांसाठी एक या प्रमाणे वनरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर नजीकचे नियंत्रण वनपालाचे असते. वनरक्षकाच्या नियंत्रणाखाली वनमजूर स्थानिक पातळीवर काम करतात. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, नवीन वृक्ष लागवड करणे, गाव पातळीवर वन विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करणे, वृक्ष लागवड व संगोपनाबाबत लोकांचे प्रबोधन करणे, इत्यादी कामे करतो.[१]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Gatha Cognition". www.gathacognition.com (इंग्रजी भाषेत). 2023-01-11 रोजी पाहिले.