लेओनार्दो फिबोनाची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेओनार्दो फिबोनाची

लेओनार्दो फिबोनाची (मराठी लेखनभेद: लिओनार्डो फिबोनास्सी; इटालियन: Fibonacci) (इ.स. ११७०; पिसा - इ.स. १२४० [१]) हा बाराव्या शतकात होऊन गेलेला एक इटालियन गणितज्ञ होता.

योगदान[संपादन]

लेओनार्दो फिबोनाची याने अरबी अंकपद्धती रूढ केली. गणितात अंकांची नवी क्रमवारी शोधून त्याने प्रत्येक क्रमांक हा मागील दोन आकड्यांच्या बेरजेइतका असतो असे दाखवून दिले. फिबोनाचीने "लिबेर अबाची" (अर्थ: "मोजणीचे पुस्तक") आणि "लिबेर क्वाद्रातोरुम" (अर्थ: "वर्गांचे पुस्तक") या गणिती ग्रंथांची निर्मिती केली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. द फिबोनाची सिरीज - बायोग्राफीज - लेओनार्दो फिबोनाची (इ.स. ११७५ - इ.स. १२४०). लायब्ररी थिंकक्वेस्ट डॉट ऑर्ग. २१ जुलै, २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर) )

बाह्यदुवे[संपादन]