राष्ट्रीय क्रीडा दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्रीय क्रीडा दिन हा विविध देशांमध्ये राष्ट्रीय क्रीडा संघ आणि त्या देशांच्या क्रीडा परंपरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाणारा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. या दिवशी विविध वयोगटातील लोक खेळांमध्ये भाग घेतात.

देशानुसार राष्ट्रीय क्रीडा दिन[संपादन]

भारत[संपादन]

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिवशी २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. [१] हा दिवस १९२८, १९३२आणि १९३६ मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या आत्मचरित्र 'गोल्स' नुसार त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १९२६ ते १९४९ मध्ये 900 गोल केले. [२]

इराण[संपादन]

इराणमध्ये, १७ ऑक्टोबर हा शारीरिक शिक्षण आणि क्रीडा दिवस म्हणून ओळखला जातो आणि १७ ते २३ ऑक्टोबर या आठवड्याला "शारीरिक शिक्षण आणि क्रीडा सप्ताह" असे नाव दिले जाते. [३] लोकांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात व्यायामाचे महत्त्व मांडणे हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि घटनेच्या अनुच्छेद ३ मध्ये देखील यावर जोर देण्यात आला आहे.

जपान[संपादन]

जपानचा आरोग्य आणि क्रीडा दिवस हा ऑक्टोबरमध्ये साजरा केला जाणारा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. [४] हे प्रथम १० ऑक्टोबर १९६६ रोजी आयोजित करण्यात आले होते, टोकियो येथे 1964 उन्हाळी ऑलिंपिकच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त. पण २००० पासून तो ऑक्टोबरच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो.[५]

मलेशिया[संपादन]

राष्ट्रीय क्रीडा दिन ही मलेशियामधील राष्ट्रीय सुट्टी आहे, जी दरवर्षी ऑक्टोबरमधील दुसऱ्या शनिवारी आयोजित केली जाते.[६] तेथील लोकसंख्येमध्ये निरोगी जीवनशैलीचा प्रचार करण्याच्या मुख्य उद्देशाने हा साजरा होतो. पहिला राष्ट्रीय क्रीडा दिन २०१५ मध्ये आयोजित करण्यात आला होता. [७]

कतार[संपादन]

राष्ट्रीय क्रीडा दिवस ही कतारमधील राष्ट्रीय सुट्टी आहे, जी दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या मंगळवारी आयोजित केली जाते, ज्याचा मुख्य उद्देश तेथील लोकसंख्येमध्ये निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणे आहे. [८] पहिला राष्ट्रीय क्रीडा दिन २०१२ मध्ये आयोजित करण्यात आला होता. [९] [१०]

बहारीन[संपादन]

बहारीन क्रीडा दिवस पहिल्यांदा ७ फेब्रुवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हापासून हा कार्यक्रम दरवर्षी फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात १० ते १३ या तारखांच्या दरम्यान केला जातो. मंत्रालयांच्या आदेशाने, सरकारी क्षेत्रे, तसेच खाजगी क्षेत्रे, कंपन्या, बँका आणि शाळा, हे वॉकाथॉन आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास अर्धा दिवस सुट्टी देऊन क्रीडा दिनाला हातभार लावतात. या दिवसाचे मुख्य लक्ष्य म्हणजे युवा शक्तींना सहाय्य करणे आणि विविध वयोगटातील लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात खेळ लागू करण्यासाठी उत्साही करणे असा आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Aug 29 is National Sports Day. Did you know?". News 18. 2017-08-28 रोजी पाहिले.
  2. ^ "National Sports Day: Rare pictures from 1936 Olympics to celebrate Dhyan Chand's birthday". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-08-29. 2020-08-29 रोजी पाहिले.
  3. ^ Amirtash, Ali-Mohammad (2005-09-01). "Iran and the Asian Games: The Largest Sports Event in the Middle East". Sport in Society. 8 (3): 449–467. doi:10.1080/17430430500249191. ISSN 1743-0437.
  4. ^ "Health and Sports Day in Japan". www.timeanddate.com (इंग्रजी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.
  5. ^ "Health and Sports Day". GaijinPot Study (इंग्रजी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.
  6. ^ "Malaysians celebrate National Sports Day | The Star". www.thestar.com.my. 2020-08-29 रोजी पाहिले.
  7. ^ Friday, 23 Aug 2019 09:40 PM MYT (23 August 2019). "National Sports Day, Malaysia Sports Challenge still in plans for National Sports Month, says ministry | Malay Mail". www.malaymail.com (इंग्रजी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.
  8. ^ "National Sport Day in Qatar". Archived from the original on 2016-01-21. 2014-08-30 रोजी पाहिले.
  9. ^ "Emiri decision sets National Sports Day". Gulf Times. Archived from the original on 2012-07-11. 2012-02-14 रोजी पाहिले.
  10. ^ "Qatar Celebrates National Sports Day". Olympic.qa. 2011-12-06. Archived from the original on 2017-09-19. 2012-02-14 रोजी पाहिले.