रशियाचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे.

पूर्वेकडील स्लाव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहासाची सुरुवात केली . रशियाची राजधानी मॉस्को आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात . जून १२, १९९० तारखेला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना डिसेंबर २६, १९९१ला मिळाली

रशियन साम्राज्य-

रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता होती. रशियातील झारशाही नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएत संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट यांच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. पीटर हा अलेक्सिस प्रथम याचा मुलगा होता. पीटरने एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले. पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला. या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात. थोर राष्ट्रपुरूष पीटर वयाच्या १० व्या वर्षीच रशियाचा त्सार झाला. पण रशियाच्या राजावर तत्कालीन सरदार-उमरावांचा मोठा प्रभाव असल्याने राजा असूनही राष्ट्रापेक्षा स्वतःकडे आणि सरदार-उमरावांकडेच जास्त लक्ष असल्याने रशिया त्याकाळी असंस्कृत, गावंढळ, मागसलेला मानला जाई. पुढील दहा वर्षांच्या काळात त्सार पीटरने सर्व सत्ता आपल्या हातात एकवटली. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली.१९व्या शतकाच्या अखेरीस रशियाकडे २२,४००,००० चौ. किमी. जमीन होती. केवळ ब्रिटीश साम्राज्याकडे रशियापेक्षा जास्त जमीन होती.रशियन साम्राज्याची पश्चिम सीमा पूर्व युरोपीर मैदानापर्यंत होती.उत्तर सीमा आर्क्टिक महासागरापर्यंत होती .पूर्वेकडे सैबेरीयापर्यंत रशियाचा अंमल होता. दक्षिणेकडे कौकेशस व काड्या समुद्रपर्यंत रशियन सत्ता होती. एलिझाबेथ ही पीटर द ग्रेटची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर एलिझाबेथ बसली . तिच्या कारकिर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले. परंतु एलिझाबेथच्या मृत्युनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात दिले. कैथेरिन दुसरी किंवा "महान कॅथेरिन" हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. १८०० मध्ये रशियनचा खूप मोठा साम्राज्य झाला होता . १९१४चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' सोविएट युनिअन 'चा इतिहास असे म्हणत होते .१९८० मध्ये रशियाची आर्थिक व राज्यकारभारासंबंधी स्तिथी तीव्र अशक्त झाली होती , आणि म्हणून ' सोविएट युनिअन ' म्हणजे रशियाचा मुख्य, खाली पडले होते . अधिक्र्तपणे रशियन संघच्या इतिहास जेनुअरी १९९२ मध्ये झाला . पण रशियाने त्यांचे महाशक्ती , महासत्ता सोविएटचा राज्यकारभारासंबंधीचा आणि आर्थिक स्तिथीतून उभारण्याच हारवली होती .तेव्हा पण रशियाने हार नाही मानवली , त्यांने बाजार पुंजीवाद (भांडवलशाही) वर आधारित त्यानची आर्थिक स्तिथी सुधारण्यच प्रयत्न केले . आजही रशिया अनेक राज्यकारभारासंबंधी संस्कृती आणि सामाजिक संरचना वर सोविएटशी बातम्या व चर्चा करतात . सोव्हिएत रशिया-

सोव्हिएत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हिएत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.

सोव्हिएत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. भूरचना आणि वनस्प्तीच्या दृष्टीने सोवियेत संघाचे चार भाग पडत. अती उत्तरेच्या फिनलंडच्या सीमेपासून आर्क्टिक समुद्राच्या किनाऱ्याने बेरिंग समुद्रापर्यंत पसरलेला टुंड्राचा बर्फाच्छादित प्रदेश ज्यात मुख्यत्वे पाणथळ भाग, दलदलीचा प्रदेश, शेवाळे आणि खुरटी झुडपे यांचे साम्राज्य होते. या भागात मनुष्य वसाहत कमी होती.तैगाच्या दक्षिणेस एल्म, ओक या झाडांसह लाकडाची विपुल संपत्तीचा, सुपीक जमिनीचा प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठा, सलग, लागवडीखालचा प्रदेश अशी याची ओळख. विविध प्रकारचे कारखने, उद्योग धंदे या भागात होते. या सुपीक भागाच्या दक्षिणेला कोरड्या हवामानाचा, वाळवंटी प्रदेश होता. या भागात अनेक्दा अवर्षण, दुष्काळ असे. येथील प्रमुख पीके तंबाखू, चहा, ऊस, अंजीर, अक्रोड, बांबू, लवंग,निलगीरी ही होती. सोवियेत संघ खूप मोठा देश होता तरी एकूण उपलब्ध क्षेत्राच्या केवळ १/३ जागा लागवडी योग्य होती.

सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी ओब, येनिसी, लेना व अमूर या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या. आर्क्टिक समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला कास्पियन समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. सैबेरियातील बैकाल सरोवर जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या.सोव्हिएत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती. १९९१ साली सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रूपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.

प्रागैतिहासिक कालखंड – भूगोल , चतुःसीमा, राजकीय विभाग, मोठी शहरे, शिक्षण, संस्कृती, भाषा-

रशिया हा जगातील शेत्रफडानुसार सर्वांत मोठा देश आहे. रशियाचे एकूण क्षेत्रफळ १७,०७५,४०० चौ.किमी. आहे. रशियात २३ जागतिक वारसा स्थडे ,४० राष्ट्रीय उद्याने आहेत. रशिया देशाचे एकूण ८३ राजकीय विभाग आहेत.

२१ प्रजासत्ताक

४६ ओब्लास्ट (प्रांत)

९ प्रदेश

१ स्वायत्त ओब्लास्ट

४ स्वायत्त जिल्हे

२ केंद्रशासित शहरे

अतिपूर्व केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी आकाराने सर्वात मोठा व लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा आहे. दक्षिण केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. दक्षिण जिल्हा रशियाच्या नैऋत्य भागातकोकसस भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग दक्षिण जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात. उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी सर्वात नवा निर्माण झालेला जिल्हा आहे. १९ जानेवारी २०१० रोजी दक्षिण केंद्रीय जिल्हापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. उत्तर कोकसस भौगोलिक प्रदेशामधील रशियाचे बहुधा सर्व प्रांत ह्या जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.मध्य केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. मध्य जिल्हा रशियाच्या वास्तविकपणे रशियाच्या अतिपश्चिमेकडे पूर्व युरोपितवसला आहे. मध्य केंद्रीय जिल्हा हे नाव भौगोलिक नसून राजकीय व ऐतिहासिक कारणांसाठी वापरले गेले आहे.उरल केंद्रीय जिल्हा हारशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा रशियाच्या उरल भागात वसला आहे.वायव्य केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा रशियाच्या वायव्य भागात वसला आहे.वोल्गा केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. वोल्गा जिल्हा रशियाच्या पश्चिम भागात युरोपीय रशियामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग वोल्गा जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.सायबेरियन केंद्रीय जिल्हा हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. सायबेरियन जिल्हा रशियाच्या मध्य भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग सायबेरियन जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

घटनेनुसार रशिया एक संघराज्य व अर्ध-अध्यक्षीय लोकशाही राष्ट्र आहे. रशियात राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख, तर पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असतो.

रशिया आर्थिकदृष्ट्या प्रगतीशील राष्ट्र आहे. रशियाचा दरडोई उत्पन्नात १० वा क्रमांक लागतो.रशियन भाषा ही युरेशिया खंडामधील एक प्रमुख भाषा आहे. स्लाविक भाषांपैकी ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. रशियन भाषा इंडो-युरोपीय भाषाकुळातील स्लाविक भाषाकुळात गणली जाते. रशियन प्रथम भाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या सुमारे १६.४ कोटी (इ.स. २००६चा अंदाज) असून द्वितीय भाषा असणाऱ्या भाषकांची संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.

शेती-

२००५ साली रशियातील १,२३७,२९४ चौ.किमी. जमिन लागवडीखाली होती. केवळ भारत ,चीन व अमेरिकेत यापेक्षा जास्त जमिन लागवडीखाली आहे. उर्जा-

रशियाला प्रसारमाध्यमे उर्जा महासत्ता म्हणतात. रशियात सर्वाधिक नैसर्गिक वायु सापडतो. वाहतूक-

रशियातील रेल्वेवाहतूक संपुर्णपणे सरकारने चालविलेल्या रशियन रेल्वे मार्फत होते. रशियात एकूण ८५,००० कि.मी. रेल्वेमार्ग आहेत. २००६ साली रशियात ९,३३,००० कि.मी. रस्ते होते. यातील ७,५५,००० कि.मी.रस्ते पक्के होते.

रशियन क्रांती'

क्रांतीपूर्व काळात रशियात झार घराम्याची सत्ता होती. इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली. रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरू झाले. पहिले महायुद्धात रशियनची क्रांती(१९०७) – पहिले महायुद्ध हे इ.स. १९१४ ते इ.स. १९१८ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे ( फ्रांस ,रशियन साम्राज्य ,युनायटेड किंग्डम व नंतर इटली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने ) व केंद्रवर्ती सत्ता ( ऑस्ट्रिया-हंगेरी ,प्रशिया (वर्तमान जर्मनी ), बल्गेरिया ,ओस्मानी साम्राज्य यांच्या दरम्यान झाले. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. १९१६ साली ब्रुसिलोव्हमध्ये विजय मिळवूनही रशियात सरकार विरोधी असंतोष वाढत होता. झारची राजवट नावापुरती होती. खरी सत्ता महाराणी आलेक्झानद्र हिच्या व ग्रिगोरी रास्पोतिन याच्या हातात होती. असंतोष वाढत गेल्यावर ग्रिगोरी रास्पोतिन याचा १९१६ च्या अखेरीस खून करण्यात आला. मार्च १९१७ साली, पेट्रोग्राडमध्ये झारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यामुळे झारने सिंहासनाचा त्याग केला व एक कमकुवत हंगामी सरकार स्थापण्यात आले. या गोंधळात आघाडीवरचे लष्कर निकामी ठरले. हंगामी सरकारबद्दलचा असंतोष वाढत असतानाच व्लादिमिर इलिच लेनिनच्या पक्षाची ताकद व लोकप्रियता वाढत होती. लेनिनने सरकारला युद्ध थांबवण्याची मागणी केली. बोल्शेव्हिकांनी केलेला सशस्त्र उठाव यशस्वी ठरला. लेनिनने लगेच प्रशियाला युद्ध थांबवण्याची मागणी केली. ही मागणी प्रशियाला पटली नाही. नंतर ब्रेस्ट-लिटोव्हस्कचा तह झाला. यानुसार फिनलॅंड, बाल्टिक देश, पोलंड व युक्रेन केंद्रवर्ती सत्तांना देण्यात आले. इतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य ही साम्राज्ये नामशेष झाली.

मॉस्को , सेंट पीटर्सबर्ग, नोव्होसिबिर्स्क, निझनी नोव्हगोरोड, येकाटेरिनबर्ग, सामरा, ओम्स्क, काझन व चेलियाबिन्स्क ह्या सगडी रशियाची खूप मोठी आणि प्रसिद्ध शहरे आहे .

रशियन झारच्या खजिन्याचे रहस्य-

पहिल्या महायुद्धाच्या वेळी, रशियन साम्राज्याचा त्या वेळचा झार, दुसरा निकोलस याने, आपला खजिना जर्मन सैनिकांच्या हातात पडू नये म्हणून राजधानी सेन्ट पीटर्सबर्ग मधून, मॉस्कोच्या पूर्वेला असलेल्या काझन या ठिकाणी हलवला होता. या खजिन्यामधे 500 टन नुसते सोनेच होते. 5000 पेटारे आणि 1700 पोती यात हा खजिना भरलेला होता व एका अंदाजाप्रमाणे त्याची किंमत 650 मिलियन रूबल्स एवढी तरी होती पहिले महायुद्ध संपण्याच्या आधीच, रशियामधे 1917 सालच्या ऑक्टोबर महिन्यात बोल्शेव्हिक क्रांती लेनिनच्या नेतृत्वाखाली झाली. ही क्रांती करणारे बोल्शेव्हिक सैनिक व झारशी एकनिष्ठ असलेले रशियन अधिकारी व सैन्य यांच्यातील यादवी युद्ध 1922 पर्यंत चालू होते. 1922 मधे बोल्शेव्हिक पक्षाने संपूर्ण रशियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. या यादवी युद्धाच्या दरम्यान म्हणजे 1919 साली झारच्या पक्षाचा एक वरिष्ठ सेनाधिकारी, ऍडमिरल अलेक्झांडर कोलचेक याने उरल पर्वतच्या भागात झेक सैनिकांच्या मदतीने उठाव केला व काझन शहरातून बोल्शेव्हिक सैनिकांना तेथून हुसकावून लावले. त्याच्या साथीला असलेल्या झेक सैनिकांना, ‘व्हाईट गार्डस‘ असे नाव पडले आहे. दुसऱ्या निकोलसच्या खजिन्याचा बराचसा हिस्सा, ऍडमिरल कोलचेव्ह व त्याचे व्हाईट गार्डस यांच्या हातात पडला. हा खजिना हलवण्यासाठी या सैनिकांना 40 रेल्वे वॅग न्स वापराव्या लागल्या. ऍडमिरल कोलचेव्ह व त्याचे सैनिक यांनी हा खजिना कुठे हलवला हे गूढ गेली 90 वर्षे तरी रशियन इतिहास संशोधकांना सोडवता आलेले नाही. काझनमधल्या विजयानंतर, झारच्या नाविक दलात ऍडमिरल असलेल्या कोलचेव्हने, बोल्शेव्हिक सैनिकांच्या विरुद्ध सर्वांनी लढावे म्हणून प्रयत्न केले व स्वतःची हुकुमशाही राजवट, उरल पर्वताच्या भागात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला त्यात यश आले नाही व रेड गार्डस बरोबरची लढाई तो हरला व त्यांच्या तावडीत सापडला. यानंतर त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. कोलचेव्हबरोबरच्या झेक सैनिकांनी निकोलसचे सोने असलेल्या रेल्वे वॅगन्स कुठे व कशा हलवल्या हे आतापर्यंत न समजलेले गूढ आहे. या व्हाईट गार्डसचा युद्धात पराभव झाल्यावर आपल्याला झेकोस्लिव्हाकियाला परत जाऊ देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळ असलेले काही सोने मॉस्को मधल्या सरकारला देऊ केले व त्याच्या बदल्यात रशियातून पळ काढण्यात ते यशस्वी झाले. बाकीच्या सोन्याची या व्हाईट गार्डसनी कशी विल्हेवाट लावली असवी या बद्दल अनेक तर्ककुतर्क गेली 90 वर्षे केले गेले आहेत. काही लोकांच्या मताने हे सोने या झेक सैनिकांनी चोरट्या मार्गाने झेकोस्लोव्हाकियाला नेले असावे. व 1920च्या सुमारास झेकोस्लोव्हाकिया देशात आलेली अचानक सुबत्ता या सोन्यामुळेच होती. काही लोकांच्या मते, हे सोने या झेक गार्डसनी जपान व इंग्लंड मधल्या बॅन्कात ठेवले असावे. रशियाच्या पूर्व भागात व सैबेरियाच्या दक्षिणेला, लेक बैकल म्हणून एक विशाल जलाशय आहे. जगातील गोड्या पाण्याचा हा सर्वात मोठा जलाशय आहे असे मानले जाते. कोलचेव्हच्या उठावाच्यावेळी हा लेक संपूर्ण गोठलेला होता. काही लोकांच्या मताने, व्हाईट गार्डसनी सोन्याने भरलेल्या रेल्वे वॅगन्स, या गोठलेल्या लेक बैकल वरून ओढत नेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या वजनाला अतिशय जड असल्याने या जलाशयाच्या पृष्ठभागावरचा बर्फाला भेगा पडून तो फुटला व या सर्व वॅगन्स लेक बैकलमधे बुडल्या असाव्यात. या कथेला सत्याचा थोडा आधार आहे. 1904-1905 मधल्या रशिया-जपान युद्धात या लेक बैकलच्या पृष्ठभागावर रेल्वेचे रूळ टाकण्यात आलेले होते. गेली 2 वर्षे, रशियाच्या ‘मिर‘ या शास्त्रीय संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन पाणबुड्या, लेक बैकलमधे संशोधन कार्य करत आहेत. या मिर पाणबुड्या, त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘टायटॅनिक‘ या बुडलेल्या जहाजाच्या शोधून काढलेल्या अवशेषांमुळे, एकदम प्रसिद्धिच्या झोतात आल्या होत्या. सर्वसाधारणपणे या पाणबुड्या अटलांटिक व हिंदी महासागरात संशोधन करत असतात. या मिर पाणबुड्यांना, निकोलसच्या सोन्याची ही दंतकथा सत्य आहे का हे पडताळून पाहण्याची नामी संधीच मिळाली आहे. लेक बैकलचे संशोधन पूर्ण होण्याच्या अवस्थेत आलेले असताना, अचानक मागच्या आठवड्यात या पाणबुड्यांना, रेल्वेच्या पुलावर वापरतात त्या पद्धतीचे मोठे लोखंडी गर्डर आढळून आले. पृष्ठभागापासून 400 मीटर खाली एका उताराच्या भागावर जास्त शोध घेतला असता ते गर्डर एखाद्या रेल्वे वॅगनचा भाग असावेत असे वाटले. यानंतर थोड्याच वेळात या पाणबुडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात चमचम करणाऱ्या सोन्याच्या कांबी या पाणबुडीचा चालक बेअर स्त्र्येनॉव्ह व त्याचे दोन सहकारी यांना आढळून आले. स्त्र्येनॉव्ह हा लेक बैकलच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक शास्त्रज्ञ आहे. स्त्र्येनॉव्हचा एक सहकारी रोमन फॉनिन हा म्हणतो की या सोन्याच्या कांबी लेकच्या तळावर असलेल्या चिखलात एवढ्या रुतून बसलेल्या अहेत की त्या बाहेर काढणे आम्हाला शक्य झाले नाही. परंतु या आठवड्यात आणखी काही पाण्याखालच्या डाईव्ह्स घेऊन, दुसरा निकोलस या झारच्या सोन्याचे गूढ आम्ही सोड्वणारच आहोत. मात्र त्याला असे वाटते की हे सोने जरी बाहेर काढण्यात यश मिळाले तरी व्हाईट गार्डस व सोने यांची दंतकथा काही लोक विसरणार नाहीत. उलटी ती त्यांच्या जास्तच स्मरणात राहण्याची शक्यता आहे.

नोंद[संपादन]

तळटिपा[संपादन]