योनी मनीच्या गुजगोष्टी
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
मूळ नाव व्हजायना मोनोलॉग' | |
लेखन | लेखिका इव्ह इन्सलर भाषांतर वंदना खरे |
दिग्दर्शन | श्रीमती वंदना खरे |
कलाकार | संवाद: वंदना खरे, गीतांजली कुलकर्णी, सावित्री मेधा अतुल, संगीता टिपले, निर्मला देशपांडे, सुहिता थत्ते, मेघा कुलकर्णी |
स्त्री अवयवाच्या स्वगतांचे अभिवाचन मांडणाऱ्या नाट्यप्रयोगात ‘योनी’ या स्त्री अवयावला मध्यवर्ती व्यक्तिरेखा केले गेले आहे.
स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी बोलायला एक ‘अवकाश’ (स्पेस) निर्माण करणारी संधी या नाटकाच्या निमित्ताने तयार व्हावी, या मूळ उद्देशाने स्त्रीवादी प्रशिक्षक संशोधक आणि लेखिका वंदना खरे यांनी इव्ह एन्सलर या स्त्रीवादी लेखिकाने ‘व्हजायना मोनोलॉग या इंग्रजी नाटकाचे स्वैर भाषांतर करून ऊभा केलेला नाट्य.प्रयोग या प्रयोगांच्या निमित्ताने स्त्रियांनी आपल्या लैंगिकतेकडे ‘शारीरिक आरोग्य’ या मुद्दय़ापलीकडे जाऊन पाहावे असा प्रयत्न वंदना खरे यांनी या नाटकाच्या माध्यमातून केला आहे..[१]
प्रेक्षकवर्ग अभिरुचीपूर्ण परिपक्व प्रेक्षक आणि वातावरण ही या प्रयोगासाठी आवश्यक व अपरिहार्य बाब आहे.[१]
प्रयोग
[संपादन]प्रयोगात ‘योनी’ला मध्यवर्ती व्यक्तिरेखा केले गेले आहे. आणि मग सर्व अंगांनी एखाद्या विषयाला भिडावे, तो विषय सर्वार्थाने फुलवावा, तसा खटाटोप त्यांनी यात केलेला आहे. योनी या विषयाबद्दलच्या संकोचातून तिला बहाल केले गेलेले समानार्थी बोलशब्द, तिच्या अंतरंगाबद्दलची अनभिज्ञता, तिच्या अस्तित्वाची बेदखल, तिच्याबद्दल बोलण्याची घृणा, तिची एकूणच उपेक्षा- हे सारे अतिशय मोकळेढाकळेपणाने या प्रयोगात व्यक्त झाले आहे. त्याला स्पष्ट, धीट आणि गंभीर बाज आहे. नर्मविनोद, उपहास यांच्या ड्रेसिंगसह ते वास्तव समोर येते आणि म्हणूनच ते पेलणे सुकरही होते. या अवघड विषयावर महत्प्रयासाने काहीजणींना बोलते केले, तर सलज्ज कोकणी गोयंकार बाई कशी व्यक्त होईल, घाटावरच्या रांगडय़ा भाषेतले प्रकटीकरण कसे असेल, एखादी टीनएजर याच विषयावर काय सांगेल, आणि ७० वर्षीय जुने खोड तिच्या नाजूक अवयवाबद्दल काय बोलेल, अशा विविध अभिव्यक्ती त्या- त्या भाषेच्या छटांसह सामोऱ्या येतात तेव्हा विविध संस्कृतींतील योनीविषयक दृष्टिकोनांचे कवडसे आपल्यासमोर सादर होतात. आणि त्यामुळेच हे रूपांतरण परके वाटत नाही.
विविध अनुभवांचा कॅलिडोस्कोप या नाटकात समोर येतो. या अवयवाचे अस्तित्वच हीन मानणाऱ्या एका तरुणीला नेमका त्यावर मनःपूत प्रेम करणारा प्रियकर भेटतो, तेव्हा तिचा त्या अवयवाकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलून जातो. ती चक्क त्या अवयवाच्या प्रेमात पडते आणि मग इतकी वर्षे नकोशी असलेली योनी ती मोठय़ा असोशीने सांभाळू लागते. तिचा अभिमान बाळगू लागते.
एकीकडे असा सुखद सोहळा, तर दुसरीकडे भयंकर अनुभवाचा अंगार. युद्धनीतीचा भाग म्हणून बलात्काराच्या अस्त्राला बळी पडलेल्या महिलेच्या योनीने किती भयंकर अत्याचार अनुभवले असतील, हे जागतिक वास्तव दुसरी स्त्री अत्यंत विखारी शब्दांत परिणामकारकतेने शब्दांकित करते.
शृंगार आणि सृजन या दोन्ही भूमिकांत महत्त्वाचा ठरणारा हा अवयव. सृजनाच्या वेळी स्वतःचा नाजूकपणा भिरकावून देत विशाल रूप धारण करणाऱ्या योनीचा, तिच्या प्रजननक्षमतेचा यथार्थ गौरवही यात आहे.
या नाटकात योनीला व्यक्तिरेखेची भूमिका दिल्यामुळे तिला अनेक अंगांनी सादर केले गेले आहे. तिच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, आवडी-निवडी ज्या एरवी अव्यक्त राहिलेल्या असतात, त्या इथे थेटपणे शब्दबद्ध होतात. या प्रयोगाला अभिवाचनाचे स्वरूप होते. आठजणींनी स्टेजवर रांगेत खुच्र्या मांडून केलेले हे अभिवाचन, काळ्या-लाल रंगांची वेशभूषा असा हा साधासुधा प्रयोग होता. पण कसदार लेखन आणि वंदना खरे, गीतांजली कुलकर्णी, सावित्री मेधा अतुल, संगीता टिपले, निर्मला देशपांडे, सुहिता थत्ते, मेघा कुलकर्णी यांची प्रत्ययकारी संवादफेक यामुळे एकंदर आविष्कार सफाईदार होता. विशेषतः सावित्री आणि गीतांजली यांची अभिवाचने तर भन्नाट होती. या प्रयोगात प्रेक्षकांनाही सुरुवातीलाच सामील करून घेतले गेले होते. त्यांना मोकळेपणी प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे आवाहन केले गेले होते. त्यामुळे एकूणात संकोची विषयावरचा हा प्रयोग एकदम निःसंकोचपणे सादर झाला. [२]
मूळ नाटक
[संपादन]इव्ह एन्सलर या स्त्रीवादी लेखिकाने ‘व्हजायना मोनोलॉग’ हा एकपात्री कार्यक्रम स्वतः लिहून रंगमंचावर आणला. त्याचा पहिला प्रयोग ३ ऑक्टोबर १९९६ रोजी न्यू यॉर्कमध्ये सादर करण्यात आला. यथावकाश त्यात तीन अभिनेत्री आल्या व त्याच्या संहितेतही वेळोवेळी बदल घडत गेले. होणारी सांगोपांग चर्चा ही योनी या एका अवयवाशी संबंधित असेल याची दक्षता नेहमीच घेण्यात आली. उदा. संभोग, रजस्राव, हस्तमैथुन, मोनोपॉज, अपत्यजन्म वगैरे. मेरिल स्ट्रीप, जेन होंडा, ओप्रा विन्फ्रे, गोल्डी हॉन, व्हूपी गोल्डबर्ग या नामवंत अभिनेत्रींनी त्यात वेळोवेळी हजेरी लावल्याने ‘व्हजायना मोनोलॉग’चा बोलबाला झाला.
लैंगिकतेबद्दल प्रबोधन करणे हा नाटकाचा मुख्य हेतू आहे. प्रियकराला किंवा गायनकॉलजिस्टला स्त्रीच्या देहाची माहिती असते तेवढी माहितीही स्त्रीला अजिबात नसते. स्त्रीने आपल्या देहाबद्दल माहिती करून घ्यायला हवी. त्याच्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. व्हजायना हा शब्द म्हणताना शरमू नये. शरीराचा एक हिस्सा जो जितका आत्यंतिक सुखदायी किंवा तितकाच दुःखदायीही असू शकतो त्याचा वारंवार उद्घोष केल्यास लाज गळून पडेल. (एखाद्या नाट्यशिबिरातही वेगळे काय असते?) कंडिशनिंग निघून जाईल. भीड चेपली जाईल.
संभोगातले सीत्कार कुणा स्त्रीला मशिदीतल्या अजानीसारखी तर कुणाला घंटानादासारखे भासतात. थोडक्यात सेक्स ह्या विषयाबाबत पुरुषाला वाटते ते ते/तसेच स्त्रीलाही वाटू शकते. पण तो विषय तिच्यासाठी टॅबू आहे. विनोदाची पेरणी (आय हॅव लॉस्ट माय क्लिटॉरिस. इट्स गॉन...) क्वचितच एकदोन ठिकाणी केली आहे. म्हणजेच पुरुषांसारखेच विनोद स्त्रियाही करतात, करू शकतात. एकंदर ह्या नाटकातला धीटपणा, विशेषतः भाषांतर झाल्यावर, भारतीय पार्श्वभूमीवर, काहींना सवंग वाटू शकतो, हेदेखील जाणवले.
ह्या नाटकाने प्रेरित होऊन ज्या व्ही-कार्यशाळा होतात त्यांचे काम प्रबोधनाचेच आहे. पण ही नाटकाच्या पुढची पातळी आहे.
नाटकाच्या सुरुवातीला काही सूचना देण्यात येतात. त्यात प्रत्येकाच्या भावनांचा आदर राखण्यासाठी ज्यांना आता हे पचनी पडत नाही असे वाटल्यास शांतपणे निघून जाण्याबद्दलही सूचना होती. मोबाईल्स स्विच ऑफ करण्याबाबत सूचना होती जर मोबाईल वाजल्यास नाटकाचा प्रयोग त्या ठिकाणी त्यावेळेपुरता थांबवण्यात येईल असे ही सांगण्यात आले. हसू आल्यास जरूर हसावे अशी देखील सूचना होती. आपण कोण? आपला सामाजिक दर्जा काय या बाबी बाजूला करून नाटक पहावे.
व्हजायना हा शब्द म्हणताना शरमू नये. शरीराचा एक हिस्सा जो जितका आत्यंतिक सुखदायीही किंवा तितकाच दुःखदायीही असू शकतो त्याचा वारंवार उद्घोष केल्यास लाज गळून पडेल. (एखाद्या नाट्यशिबिरातही वेगळे काय असते?) कंडिशनिंग निघून जाईल. भीड चेपली जाईल.
या मुद्द्या भोवती नाटकाचा बराच भाग होता. सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या तोंडातुन योनी शब्द उच्चारणा करण्यासाठी किती संकोच होतो हे चाचपण्यासाठी 'म्हणा योनी' असे आवाहन केल्यावर प्रेक्षकांनी ही योनी शब्द एकमुखाने उच्चारला.नाटकात सभ्य लोकांत् न वापरता येणारे शब्द चर्वण करता येतात म्हणून काही पुरुशांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील असे मात्र वाटले नाही. कदाचित माझ्या ग्रामीण पार्श्वभुमीमुळे तसे असेल.
याचा नाट्याविष्कार तर अवर्णनीय.यातील विविध छटा या केवळ ध्वनीपुरत्या मर्यादित नव्हत्या. त्याला विनोदाची झालर ही होती. त्यात विविध पेशे, सामाजिक स्थाने, संस्कृती यांचाही आविष्कार . ध्वनितांची केणीच म्हणा ना!
दोन योन्यांच्या स्वगतांचा सुखद व दुःखद आविष्कार तर उत्तम नाट्यप्रसंग. झाडूवाली बाई आपल्या पुच्चीविषयी बोलताना जपलेली बाईची दुःख, समुपदेश,पुरुषप्रधानता, व्यभिचार, श्रृंगार, लैंगिक स्वच्छता या विषयी बाबत संवाद तर अप्रतिम. नाट्याविष्कारात प्रमाण भाषा म्हणजे नैतिक वा श्लील व बोली भाषा म्हणजे अनैतिक वा अश्लील असा दुजाभाव कुठेही केलेला नाही. निष्कारण बोली भाषेतील शब्द प्रमाण भाषेत कुठेही भावानुवादित केले नाहीत. जिथे प्रमाण भाषा वापरणे हे उचित आहे तिथे प्रमाण भाषा जिथे बोली भाषा वापरायची गरज आहे तिथे बोली भाषा. योनी शब्द कुठे वापरायचा व पुच्ची कुठे वापरायचा याचे भान संवादात आहे.
चुत् या शब्दाभोवती गुंफलेले सांगितिक अप्रतिम. चुत शब्दातील नादमयता ज्या आविष्काराने दाखवली आहे ती पहाता एखाद्याला चुत्या म्हणताना ती शिवी नसून वेगळ्या दृष्टीने पाहिल्यास सन्मान वाटावा इतका उत्तम. 'चुत् बाई चुत्' हा कीस बाई कीस दोडका कीस या धर्तीवर घेतलेला लोकगीतात्मक आविष्कार. शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवी अस वाटावं इतकी नादमयता. बीभत्स, अश्लील या शब्दार्थांची पारंपारिक पुटे गळून पडावीत असा हा नाट्याविष्कार. योनी भोवतीच्या रस, गंध, स्पर्श, दृष्य, श्राव्य अशा सर्व गोष्टी त्यात गुंफल्या आहेत.
ह्या नाटकाने प्रेरित होऊन ज्या व्ही-कार्यशाळा होतात त्यांचे काम प्रबोधनाचेच आहे. पण ही नाटकाच्या पुढची पातळी आहे.
नाटकाच्या शेवटी पसायदानासारखा योनी वरील संस्कृत श्लोक घेउन एक आध्यात्मिक टच दिला आहे.
चळवळ
[संपादन]टीका
[संपादन]हा प्रयोग भारतीय संस्कृतीस अनुलक्षून नसल्याची टीका शिरीष कणेकर यांनी साप्ताहिक लोकप्रभातून केली.[३][४]. कणेकरांची टीका नाटकाचा अत्यल्प भाग पाहून चुकीचे वा दिशाभूल करणारे अर्धवट संदर्भ देऊन केली आहे, स्त्रियांच्या लैंगिकतेचे दमन हा महत्त्वाचा आणि वैश्विक मुद्दा आहे, एकीकडे जागतिकीकरण आणि दुसरीकडे धार्मिकता, पारंपरिकता यांच्या दबावामध्ये स्त्रियांची परिस्थिती अधिकच बिकट होत चाललेली आहे, अशा परिस्थितीत या मौनाला वाचा फोडणे अधिकच गरजेचे होऊन बसलेले आहे. नाटकामुळे त्या दिशेने आम्ही एक पाऊल उचलले आहे वंदना खेर यांनी साप्ताहिक लोकप्रभातूनच उत्तर दिले [५].
संदर्भ
[संपादन]- ^ a b "संग्रहित प्रत". 2010-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-01 रोजी पाहिले.
- ^ शुभदा चौकर Archived 2010-07-19 at the Wayback Machine. २ फेब्रू २०१० लोकसत्ता १३.२० वाजता संस्थळ पान जसे दिसले
- ^ "लोकप्रभा". 2009-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-01 रोजी पाहिले.
- ^ [Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=219&Itemid=217&limitstart=12. It is a snapshot of the page as it appeared on 23 Jan 2010 03:59:15 GMT][मृत दुवा].
- ^ "संग्रहित प्रत". 2010-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-13 रोजी पाहिले.
- ^ [१][permanent dead link]