मुंगूस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंगूस
मुंगूस
मुंगूस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: नकुलाद्य
बोनापार्ट, १८४५
Herpestidae.png

मुंगूस (कुळनाम : हर्पेस्टिडे) हे दक्षिण युरेशिया व मुख्य आफ्रिका खंडात आढळणाऱ्या मांसभक्षक, सस्तन प्राण्यांच्या ३३ प्रजातींचे कुळ आहे. मुंगसांच्या विविध प्रजातींमधील पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांची लांबी प्रजातीगणिक १ ते ४ फूट (०.३० मी. ते १.२ मी.) आढळते. वजनाच्या दृष्टीने खारीएवढ्या दिसणाऱ्या व २९० ग्रॅमांएवढे वजन असलेल्या छोट्या मुंगसांपासून मांजरीएवढ्या आकारमान असलेल्या व ४ किलोग्रॅम वजनाच्या पांढऱ्या शेपटीच्या मुंगसापर्यंत प्रजातीगणिक वैविध्य आढळते. साप हे मुंगसाचे प्रमुख भक्ष आहे. त्यामुळे मुंगूस व साप या दोघांमध्ये कट्टर वैर आहे.