मलार्ड बदक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मलार्ड बदक अथवा नुसतेच मलार्ड. (शास्त्रीय नाव - Anas platyrhynchos Linnaeus) ( हे कदाचित सर्वात सुंदर बदक म्हणून मानण्यात येते. भारतात मुख्यत्वे हे बदक स्थलांतरित असुन उत्तर भारतातील पाणथळी जांगामध्ये हिवाळ्यात मोठया प्रमाणावर स्थलांतर करतात. हे पक्षी युरोपातील व सायबेरियातील स्थानिक पक्षी मानण्यात येतात. भारतातील यांचा आढळ उत्तर भारतापुरता मर्यादीत आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे हा पक्षी नसल्यात जमा आहे. सवयी- हा पक्षी मुख्यत्वे शाकाहारी असून, पाणथळी जागातही दलदली व कमी खोल जागा पसंत करतो. पाण्यात पोहोताना शेपूट वर करुन मादीला पटवण्याचे काम सातत्याने चाललेले असते. इतर बदकांच्या मानाने याचा उडण्याचा वेग जास्त आहे त्यामुळे शिका-यांना याची शिकार करणे साहसी वाटते.
[संपादन] इतर नावे
हिंदी, बंगाली- नीलसीर
सिंधी- नीरागी, हिरागी,
कच्छ- राजे
[संपादन] संदर्भ
- Book of indian birds- ले. डॉ.सलिम अली १३वी आवृती २००२

