भूतानमधील महिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भूतानमधील महिला
भूतानमधील एक महिला, २०११
सामान्य सांख्यिकी
माता मृत्यू दर (प्रति १,००,०००) १८० (२०१०)
संसदेतील महिला १३.९% (२०१२)
माध्यमिक शिक्षणासह २५ वर्ष पेक्षा जास्त महिला ३४% (२०१०)
कामगार शक्ती मध्ये महिला ६५.८% (२०११)
लिंग असमानता निर्देशांक
मूल्य ०.४६४ (2012)
स्थान ९२ वा
वैश्विक लिंगभेद निर्देशांक[१]
मूल्य ०.६३८ (२०१८)
स्थान १२२वा

 

आर्थिक सहभाग[संपादन]

आर्थिक विकासामुळे महिलांना वैद्यकीय, शिक्षण, प्रशासन, औषध संशोधन आणि परिचारिका यासारख्या क्षेत्रांमध्ये भाग घेण्याच्या संधी वाढल्या आहेत. स.न.१९८९ पर्यंत जवळजवळ १० टक्के सरकारी कर्मचारी महिला होत्या आणि १९८९ मध्ये सर्वोच्च नागरी सेवा परीक्षेमध्ये यशस्वी रित्या उत्तीर्ण होणारी एक महिला होती. त्यांच्या सरकारी कारकिर्दीदरम्यान, महिला नागरी सेवकांना तीन प्रसूतीसाठी पूर्ण वेतनासह तीन महिन्यांची प्रसूती रजा आणि अतिरिक्त प्रसूतीसाठी वेतनाशिवाय रजा देण्याची तरतूद करण्यात आली.

समाजात पुरुषांच्या वर्चस्वाचे प्रतिबिंब शाळांमधून दिसून येत होते. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शाळांमध्ये मुलींची संख्या तीन मुलांमागे दोन अशी होती. सीएसओ, एमबीओ इत्यादींसह अनेक महिला समर्थक संघटना वाढत आहेत. स्त्रिया वैयक्तिक आणि कुटुंबांच्या उपजीविकेसाठी योगदान देत असल्याचे दिसून आले आहे. भूतानमध्ये सार्क बिझनेस असोसिएशन ऑफ होम बेस्ड कामगार (सबाह) संस्था कार्यरत आहे. ही संस्था भूतानमध्ये विणकाम, टेलरिंग अन्न प्रक्रिया आणि इतर आर्थिक उपक्रमांद्वारे स्त्रियांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे स्त्रियांना कुटुंबासाठी कमाईसाठी हातभार लावता येतो.

राजकीय सहभाग[संपादन]

स.न. २००८ ते २०११ दरम्यान, शोगपा किंवा स्थानिक शासकीय परिषदेच्या सदस्यांच्या भरतीमध्ये महिलांचा सहभाग फारच कमी होता. त्यामुळे गंभीर समस्या उध्भवली होती. यात बरेच अडथळे होते जसे की स्वारस्य नसणे , आर्थिक प्रोत्साहनांचा अभावा, विद्यमान निवडणूक कायद्यांनुसार अनुपालन आणि मान्यता प्राप्त करण्यात येणाऱ्या अडचणी अशी बरीच कारणे होती.[२]

अनेक गेवागमध्ये (गावांचा समुह) कार्यात्मक साक्षरता आणि कौशल्य चाचणीच्या पहिल्या फेरीमध्ये कोणीही महिला प्रतिनिधी उत्तीर्ण होत नव्हते परंतु दुसऱ्या फेरीच्या निकालांमध्ये ९०%पेक्षा जास्त उत्तीर्णता दिसून येत होती. पदावर निवड झालेल्या महिला तुलनेने कमी असायच्या ( यूएनएचसीआरनुसार स्थानिक निवडणुकांपूर्वी १४%). परंतु स्थानिक सरकारच्या निवडणुकांमध्ये निम्म्याहून अधिक मतदार महिला होत्या. २०११ मध्ये स्थानिक पातळीवरील सुरुवातीच्या मतदानात सुमारे ५०%मतदान झाले.[२][३][४][५][६] यामुळे महिलांना सार्वजनिक सेवेतील कोट्यातून फायदा होईल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. ज्यात महिलांच्या निवडणूक आणि राजकीय सहभागाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे अधोरेखित करण्यात आले.[७]

इतिहास[संपादन]

१९८० च्या दशकातील महिलांनी कृषी कार्य दलात लक्षणीय भूमिका बजावली. तिथे त्या पुरुषांच्या तुलनेत जास्त होत्या. बहुतेक पुरुष सेवा क्षेत्रांसाठी आणि इतर शहरी औद्योगिक आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी जास्त सहभागी होते. १९८० च्या दशकाच्या मध्यावर, पंधरा ते चौसष्ट वयोगटातील सर्व भूतानी महिलांपैकी ९५ टक्के महिला शेतीच्या कामात गुंतल्या होत्या, तर त्याच वयोगटातील फक्त ७८ टक्के पुरुष शेतीत गुंतलेले होते. परदेशी निरीक्षकांनी नमूद केले आहे की, शेतमजुरीमध्ये स्त्रियांना पुरुषांसोबत समान वाटा आहे. एकूणच, अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा जास्त काम करत होत्या. एकूण महिला कार्यशक्तीच्या ४ टक्क्यापेक्षा कमी बेरोजगार होत्या तर त्या तुलनेत जवळजवळ १० टक्के पुरुष असे होते की ज्यांच्याकडे कोणताही व्यवसाय नव्हता.

सरकारने प्रामुख्याने महिलांची सामाजिक -आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी, भूतानच्या नॅशनल वुमेन्स असोसिएशनची स्थापना केली. जी दावा डेमने स्थापन करण्यास मदत केली होती. असोसिएशनने आपल्या उद्घाटन सत्रात घोषित केले की ते महिलांसाठी समान हक्कांसाठी दबाव टाकणार नाही कारण भूतानच्या स्त्रिया आधीच राजकीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या पुरुषांच्या बरोबरीत आहेत. असोसिएशनला महत्त्व देण्यासाठी, ड्रुक ग्याल्पोची बहीण, आशी सोनम छोडेन वांगचुक यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. स.न. १९८५ पासून सुरू होणारी ही संघटना सरकारी अर्थसंकल्पातील एक विभाग बनला. या विभागाला १९९२ च्या आर्थिक वर्षात २.४ दशलक्ष नोंग्त्रुमचा निधी देण्यात आला. असोसिएशनने पारंपारिक कला आणि संस्कृती, वार्षिक आरोग्य स्पर्धा आयोजित केली होती. आरोग्य आणि स्वच्छतेचे प्रशिक्षण दिले आहे तसेच सूत आणि भाजीपाला बियाणे वितरित केले गेले. गावांमध्ये धुराविरहित स्टोव्ह देखील आहेत.

पारंपारिक विवाह आणि कौटुंबिक जीवन[संपादन]

पारंपारिक पद्धतीनुसार कौटुंबिक आणि वांशिक संबंधांवर आधारित विवाह ठरवून होत होते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात परस्पर प्रेमावर आधारित प्रेम विवाह अधिक प्रमाणात होताना दिसायला लागले. लग्नाची व्यवस्था बहुतेकदा आई-वडिलांद्वारे केली जात असे. लग्नासाठीचे वैध वय महिलांसाठी किमान सोळा आणि पुरुषांसाठी एकवीस होते. बालविवाहाची संस्था, जी एकेकाळी तुलनेने व्यापक होती, भूतानच्या आधुनिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर घसरली आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या प्रथेचे फक्त अवशेषच बाकी राहिले होते.

एकेकाळी आंतरजातीय विवाह निषिद्ध होते. परंतु १९८० च्या उत्तरार्धात अशा लग्नांना प्रोत्साहन देण्यात आले आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना १०,००० नोंग्त्रुम देण्याची व्यवस्था केली होते. स.न. १९९१ मध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना देण्यात येणारा स्टायपेंड बंद करण्यात आला. भूतानी नागरिकांचे परदेशी नागरिकांशी होणारे विवाह सरकारकडून प्रोत्साहीत केले जात नाहीत. परदेशी जोडीदाराला भूतानच्या नागरी सेवेची पदे मिळवण्याची परवानगी नव्हती. तसेच त्यांची सरकारी शिष्यवृत्ती रद्द होऊ शकत होती. तसेच आधीच मिळालेली मदत देखील परत करणे आवश्यक होती. परदेशी पती -पत्नींना अधिकाराने नागरिकत्व मिळू शकत नाही. परंतु त्यांना नैसर्गिककरणासाठी अर्ज करून असे नागरिकत्व मिळवावे लागते.

बहुपतिवत्व (एका स्त्रीचे एकापेक्षा जास्त पती‌) भुतानमध्ये दुर्मिळ आहे परंतु मेरक-सकटेनच्या ब्रोकपामध्ये अशी उदाहरणे आढळून येऊ शकतात.[८] अनेक पतींशी प्रथेनुसार लग्न झालेल्या स्त्रीला मात्र कायद्यानुसार एकच विवाह प्रमाणपत्र दिले जाते.[९] विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भूतानमध्ये बहुपत्नीत्वावर बंदी होती. १९९० च्या दशकात कायद्याने पुरुषाला तीन पत्नी करण्याची परवानगी दिली होती. यासाठी त्याला पहिल्या पत्नीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. पहिल्या पत्नीला ते पटत नसल्यास घटस्फोट आणि पोटगीसाठी दावा करण्याचा अधिकार होता. १९८० च्या दशकात घटस्फोट होणे सामान्य होते आणि नवीन कायद्यांमुळे पोटगी मागणाऱ्या महिलांना अधिक चांगले फायदे मिळाले.

हे सुद्धा पहा[संपादन]

  • कुन्झांग चोडेन, भूतानी लेखक जे स्त्रियांच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करतात
  • भूतान मध्ये बहुपत्नीत्व
  • रात्री शिकार, पारंपारिक "मैत्री" सराव
  • भूतान मध्ये गर्भपात

संदर्भ[संपादन]

  1. ^ "The Global Gender Gap Report 2018" (PDF). World Economic Forum. pp. 10–11.
  2. ^ a b "Freedom in the World 2011 - Bhutan". UNHCR Refworld online. Freedom House. 2011-05-12. 2011-05-20 रोजी पाहिले.
  3. ^ Tshering, Dechen (2011-04-16). "Tshogpa dearth for real". Kuensel. 2011-05-21 रोजी पाहिले.
  4. ^ Namgyal, Gyembo (2011-05-03). "Where have the tshogpas gone?". Bhutan Observer online. 2011-05-21 रोजी पाहिले.
  5. ^ Sherpa, Sherpem (2011-01-21). Baerthlein, Thomas (ed.). "Bhutan holds first-ever local government elections". Deutsche Welle online. 2011-05-20 रोजी पाहिले.
  6. ^ "When the candidates are illiterate". Bhutan Broadcasting Service. 2010-09-28. Archived from the original on 2011-09-27. 2011-05-20 रोजी पाहिले.
  7. ^ Pelden, Sonam (2011-08-12). "Should Bhutan Have Leadership Quotas for Women?". Bhutan Observer online. 2011-09-08 रोजी पाहिले.
  8. ^ "Feature: All in the Family", Kuensel 27 August 2007; http://www.kuenselonline.com/feature-all-in-the-family/
  9. ^ The Marriage Act of Bhutan 1980, article KHa 1-17; http://landwise.landesa.org/record/733[permanent dead link]