बॅटमॅन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बॅटमॅन (अर्थ: वटवाघूळ माणूस) हे एक काल्पनिक पात्र आहे. महानायक असलेल्या बॅटमॅनची निर्मिती बॉब केन व बिल फिंगर ह्यांनी १९३९ साली केली.तेव्हापासून बॅटमॅन हे पात्र अत्यंत लोकप्रिय बनले आहे.
काल्पनिक कथांमध्ये बॅटमॅनचे स्वरूप धारण करणारा खरा इसम म्हणजे कोट्याधीश अमेरिकन उद्योगपती ब्रुस वेन. लहानपणी आपल्या आई-वडिलांचा खून होताना पाहणारा ब्रुस गॉथम ह्या शहरामधून गुन्हेगारी नष्ट करण्याचा चंग बांधतो. ह्यासाठी ब्रुस स्वतःला शारिरिक व मानसिक रित्या तयार करतो व वटवाघूळचे पंख असलेला पोषाख परिधान करून गुप्तरित्या गॉथममधील गुन्हेगारांना नेस्तनाबूत करतो.
आजवर बॅटमॅनवर १० चित्रपट बनवण्यात आले आहेत ज्यांपैकी सर्वात नवीन चित्रपट क्रिस्टोफर नोलनने बनवलेला व २००८ साली प्रदर्शित झालेला द डार्क नाईट हा होय.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत