बी.ए.एस.एफ.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बी.ए.एस.एफ. हि जर्मनीतिल आघाडिची रसायने बनवणारी कंपनी असुन जगातिल सर्वात मोठया कंपनीच्या यादित तीचा समावेश होतो. कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र जर्मनी मध्ये मानहाइम शहराजवळ लुडविग्सहाफेन येथे आहे. कंपनीचे १०० च्या पेक्षा जास्ति ठिकाणी जगभर उत्पादन केंद्रे असुन ८१ हजार कर्मचारी काम करतात. कंपनीची स्थापना १८६५ मध्ये झालि. सुरुवातिला कपडे रंगवण्यास लागणारे रंग बनवणारी ह्या कंपनीने काळानुरुप अनेक रासायनिक प्रक्रिया विकसित केल्या. आज कंपनीचे उत्पादन मुख्यत्वे रासायने, विविध प्रकारचे प्लासटिक व पॉलिमर, रासायनिक खते, खास रसायने व पेट्रोलियम व नैसर्गीक वायु उप्तादने यात आहे. कंपनीचे वार्षिक उत्पन्न २००६ मध्ये ४ हजार कोटि युरो ( २ लाख २०हजार कोटि रुपये) इतके होते.

मानहाइम येथुन दिसणारे बी.ए.एस.एफ. कंपनीचे दृष्य
वैयक्‍तिक साधने