फिलिप ह्युज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिलिप ह्युस या पानावरून पुनर्निर्देशित)
फिलिप ह्युज

फिलिप जोएल ह्युज (३० नोव्हेंबर १९८८, मॅक्सव्हिल, न्यू साउथ वेल्स - २७ नोव्हेंबर २०१४, सिडनी) हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होता. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या ह्युजने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून खेळताना २६ कसोटी सामन्यांमध्ये १,५३५ धावा तर २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८२६ धावा काढल्या होत्या.

२५ नोव्हेंबर २०१४ रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना ह्युजला एक उसळी घेणारा चेडू मानेवर लागला. ह्या दुखापतीमुळे मणका व मेंदूला तीव्र जखम होऊन दोन दिवसांनी २७ नोव्हेंबर रोजी ह्युजचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले.

बाह्य दुवे[संपादन]