प्रोखोरोव्ह्काची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुर्स्कजवळ हालचाली करीत असलेले जर्मनीचे पॅंझर ३ आणि पॅंझर ४ प्रकारचे रणगाडे

प्रोखोरोव्ह्काची लढाई दुसऱ्या महायुद्धातील सोव्हिएत संघ आणि नाझी जर्मनीच्या सैन्यांत लढली गेलेली लढाई होती. १२ जुलै, १९४३ रोजी ही लढाई सोव्हिएत संघातील कुर्स्क शहरापासून ८७ किमी नैऋत्येस प्रोखोरोव्ह्का शहराजवळ झाली. यात कोणत्याच पक्षाचा निर्णायक विजय झाला नाही. ही लढाई जगातील सगळ्यात मोठ्या रणगाड्यांच्या लढाईतील एक समजली जाते.