प्रिंसी मंगलिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रिंसी मंगलिका
जन्म रागामा, श्रीलंका
राष्ट्रीयत्व श्रीलंकन
प्रशिक्षणसंस्था पॉझिटिव्ह वुमन्स नेटवर्क
पेशा उद्योजक, कलाशिक्षक
धर्म रोमन कॅथलिक
पुरस्कार रेड रिबन पुरस्कार


प्रिंसी मंगलिका ह्या श्रीलंकेतील सामाजिक कार्यकर्त्या आणि एचआयव्ही/एड्स पीडित आहेत. श्रीलंकेत होणाऱ्या एड्स संसर्गाशी लढा देण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी त्या प्रसिद्ध आहे.[१] त्या पॉझिटिव्ह वुमन्स नेटवर्क या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक आहेत. ही संस्था एड्स विषाणूने संक्रमित झालेल्या लोकांना मदत करते.[२] मार्च २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्रीलंकेतील संसदेने त्यांना महत्त्वाचे बदल करणाऱ्या बारा महिलांपैकी एक म्हणून गौरव केला.[३][४]

चरित्र[संपादन]

प्रिंसी श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतातील रागामा येथे जन्मल्या आणि वाढल्या. स.न. २००३ मध्ये, त्यांना एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समजले. हे संक्रमण त्यांना त्यांच्या पतीकडून झाले होते.[५] या रोगाला बळी पडल्यापासून त्यांच्याबरोबर समाजात भेदभाव होऊ लागला. यामुळे त्यांना सकारात्मक महिला नेटवर्कसाठीचा पाया घालण्याची प्रेरणा मिळाली. परदेशातील हॉटेलमध्ये काम करत असताना त्यांच्या पतीला या आजाराची लागण झाली होती. त्यांच्या पतीने या संसर्गामुळे नंतर आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी दिलेल्या त्रासामुळे गाव सोडावे लागले होते.[६]

कारकीर्द[संपादन]

वयाच्या ५३ व्या वर्षी समाजात वाईट वागणूक मिळाल्याने त्यांनी एड्स बाधित लोकांची काळजी घेण्याच्या हेतूने स.न. २००९ मध्ये पॉझिटिव्ह वुमन्स नेटवर्कची स्थापना केली. यासाठी एचआयव्ही बाधित डॉक्टर कमलिका अबेरत्ने यांनीही बरोबरीची भागिदारी केली होती. [७] स.न. २०१२ मध्ये, पॉझिटिव्ह वुमन्स नेटवर्कला त्यांच्या एड्सचे निदान झालेल्या लोकांसाठी केलेल्या उत्कृष्ट सामुदायिक सेवांसाठी संयुक्त राष्ट्रांकडून रेड रिबन पुरस्कार मिळाला.[८] स.न. २०१६ मध्ये त्यांना अनसंग हिरोईन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.[९] हा पुरस्कार अडा डेराना याच्या अंतर्गत देण्यात येतो.

हे देखील पहा[संपादन]

  • एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ Ubeyratne, Renushi (2019-03-08). "Iconic Sri Lankan Women Who Have Shaped History". Pulse (इंग्रजी भाषेत). 2019-12-01 रोजी पाहिले.
  2. ^ AsiaNews.it. "Mangalika's story: an HIV-positive Catholic woman helps fellow AIDS patients". www.asianews.it. 2019-12-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Sri Lanka : Sri Lanka parliament celebrates Sri Lankan Women Changemakers". www.colombopage.com. Archived from the original on 2019-11-08. 2019-12-01 रोजी पाहिले.
  4. ^ Mudalige, Disna; Indrakumar, Camelia Nathaniel and Menaka. "Twelve prominent women to be celebrated". Daily News (इंग्रजी भाषेत). 2019-12-01 रोजी पाहिले.
  5. ^ "Before Judging, See The Bigger Picture | The Sunday Leader" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-11-13. 2019-12-01 रोजी पाहिले.
  6. ^ "Life Online - The Right To Education". www.life.lk (English भाषेत). 2019-12-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "'මේ ගෙදරිනුත් යන්න වෙලා'- HIV ආසාදිත වීරවරියකගේ කතාව" (इंग्रजी भाषेत). 2016-10-04. 2019-12-01 रोजी पाहिले.
  8. ^ "Red Ribbon Award recognizes the work of Sri Lankan Women Living with HIV". www.unaids.org (इंग्रजी भाषेत). 2019-12-01 रोजी पाहिले.
  9. ^ "Ada Derana Sri Lankan of the Year 2016 - Award Winners". Adaderana.lk. 2019-12-01 रोजी पाहिले.