प्रसूती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गर्भाशयातील बाळ
गर्भाशयातील बदल
नवजात बालक

स्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा/बालकांचा जन्म होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात.

प्रसूतीच्या तीन अवस्था असतात.

अनुक्रमणिका

[संपादन] पहिली अवस्था

गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते व गर्भाशयमुख रुंदावते.

[संपादन] दुसरी अवस्था

बालक गर्भाशयातून खाली योनीमार्गात ढकलले जाते.

[संपादन] तिसरी अवस्था

नाळ/वार गर्भाशयाच्या भिंतीपासून सुटी होऊन योनीमार्गातून बाहेर पडते.

[संपादन] फेरफार व धोके

  • गर्भ पायाळु असणे- यामुळे बाळाचे डोके प्रसुती दरम्यान मागे अडकण्याची शक्यता असते, त्यामुळे बाळाची गुदमरण्याची शक्यता असते किंवा जीवावर ही बेतु शकते.
  • बाळ आडवे असणे.
  • प्रसुतीमार्ग व बाळाचे डोके यांची विसंगती.

[संपादन] पर्यायी ऑपरेशन

नैसर्गिक प्रसूती योनी मार्गातुन होते परंतु ज्यावेळी ती शक्य नसते त्यावेळी पोटावर ऑपरेशन करून बाळाची प्रसूती केली जाते या सीजेरियन सेक्शन ऑपरेशन म्हणतात.

[संपादन] जन्मानंतर बालकाची काळजी

जन्मानंतर सर्व प्रथम बाळाच्या तोंडातील चिकटश्राव कोरड्या साफ कपड्याने पुसून घ्यावेत व नवजात शिशुला उबदार कपड्यात गुंडाळुन ठेवावे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये