गर्भावस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख मानवाच्या स्त्रीजातितील गर्भावस्थेविषयी आहे

पोटात एक किंवा अनेक बाळे असण्याच्या स्त्रीच्या अवस्थेला गर्भावस्था म्हणतात. या काळात मासिक पाळी येत नाही कारण गर्भाशयातील अस्तरात बाळाचे पोषण होत असते. गर्भावस्थेचा अभ्यास प्रसूतीशास्त्र (Obstetrics) या विज्ञानशाखेत केला जातो.

अनुक्रमणिका

[संपादन] गर्भारकाळ

प्रसुतीकाळातील वाढीचा तक्ता

मानवामध्ये हा काळ साधारण ४० आठवड्यांचा असतो. (फलन ते बालकाचा जन्म) या काळाला गर्भारकाळ म्हणतात. गर्भारकाळाचे सामान्यतः तीन काळ मानले जातात.

[संपादन] पहिला काळ

पहिला काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले तीन महिने(१२ आठवडे) हा काळ मानला जातो. स्त्रीमधील अंतरस्त्रावांमुळे स्तनाग्रे व बाजुच्या भागात रंगात बदल होऊन ग़डद (Dark)होतो. बाळाच्या वाढीतले सुरुवातीचा हा काळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. यात वाढीचे खालील टप्पे असतात.

भ्रूण परिपक्वताचे बदल
  • फलन- पाळीच्या सामान्यतः १४व्या दिवशी स्त्रीबीज तयार होतो. त्यादरम्यान होणाऱ्या समागमात मिळणाऱ्या शुक्रजंतू योनीमार्गातून गर्भाशयात पोहचतात. ते गर्भनलिकेत एकत्र येतात. शुक्रजंतू स्त्रीबीजात प्रवेश करतात व स्त्रीबीजाचे फलन होते.
  • ५ आठवडे- पहिल्या पाच आठवड्यात भ्रुण तयार होऊन त्याबदल होतात. भ्रुण एकपेशीय कडून बहुपेशीय प्रकाराकडे रुपांतरीत होत असतो.
  • ७ आठवडे- गर्भामध्ये बदल होऊन र्‍हदय सुरु होते. अंडमध्य तयार होऊन त्यापासुन इतर अवयव तयार होण्यास प्रारंभ होत असतो.
  • १२ आठवडे- हाडांची निर्मिती सुरु होते.

[संपादन] दुसरा काळ

गर्भावस्थेतील दुसऱ्या काळात गर्भाशयाची स्थिती

दुसरा काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले तीन महिने(१२ आठवडे) ते ६ महिने (२८ आठवडे) हा काळ मानला जातो. या काळात वजन वाढण्यास सुरुवात होते. गर्भधारणा असलेले १२ आठवड्याचे गर्भाशय ओटीच्यावर हाताने जाणवता येऊ शकते. बाळाची वाढ व हालचाल सुरु राहते. २० आठवडे पूर्ण होताना मातेस गर्भाची हालचाल जाणवू लागते. गर्भातील बाळाची इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया सुरु होते. गर्भ मुत्रविसर्जन करते की जे गर्भजलाचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. याकाळात जननेंद्रिय तयार होत की जे स्त्री-पुरुष भ्रूण ओळखले जाऊ शकते.

१४-१६ आठवडे पूर्ण होताना स्तनांमध्ये पिवळसर चिकट द्रव तयार होणे सुरु होते. गर्भाशयाला ब्रॅस्टन-हिक्स आकुंचन (Braxton Hicks contractions) सुरु होतात की जी गर्भारपणात गर्भाशयाच्या स्नायूंची हालचाल करून त्यात तान व्यवस्थित करण्याबरोबर गर्भाला उत्तेजित करत असतात. याद्वारे भ्रूणातील रक्तसंक्रमण व्यवस्थित केले जाते.

[संपादन] तिसरा काळ

तिसरा काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले सहा महिने(२८ आठवडे) ते ९ महिने (३८ आठवडे) हा काळ मानला जातो.

गर्भ २९ आठवड्याचा असताना बाळाची वाढ आता झपाटाने होते, तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास लॅन्युगो(lanugo) म्हणतात. बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव संपूर्ण अंगभर पसरलेला असतो. त्यास व्हर्निक्स(vernix) म्हणतात. या काळात बाळाच्या मेंदूची तसेच फुप्फुसांची वाढ झपाट्याने होते. नाळेद्वारे माता जे सेवन करेल ते बाळापर्यंत पोहोचत असते. ३४ आठवडे पूर्ण होताना फुप्फुसांची वाढ पूर्ण झालेली असते. जशी जशी प्रसूती जवळ येते बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्यासाठी जागा कमी असते त्यामुळे बाळाची हालचाल मंदावते. ३८ आठवड्याच्या वाढीचे बाळ पूर्ण वाढीचे मानले जाते.

शेवटच्या मासिक पाळीनंतर साधारण ४० आठवड्यांनी बाळाचा जन्म होतो.

[संपादन] लक्षणे

[संपादन] आहार व व्यवहार

  1. तेलकट व मसालेदार पदार्थ टाळावेत.
  2. भरपूर दूध प्यावे.
  3. फळे खावीत.
  4. मन नेहमी आनंदी ठेवावे.
  5. सकारात्मक विचार जोपासावेत.
  6. भांडणे, हिंसक दृष्ये पाहू नयेत.

[संपादन] वैद्यकीय तपासण्या

[संपादन] रक्ताच्या तपासण्या

[संपादन] लघवीची तपासणी

  • लघवीतील जीवाणू, प्रथिने व इतर तपासण्या.

[संपादन] सोनोग्राफी

सोनोग्राफीच्या तपासणीतून बाळाची वाढ, गर्भजल प्रमाण, गर्भातील व्यंग याची तपासणी केली जाते. गर्भाच्या डोक्याचा घेर, मांडीच्या हाडाची लांबी, पोटाचा परीघ यांच्या येणाऱ्या संख्येच्या आधारे बाळाची वाढ आठवड्यांत ठरविली जाते. बाळाच्या अवयवांचा व्यवस्थित अभ्यास करून अवयवांतील व्यंग तपासले जातात. Ecografías.14 semanas.jpg

[संपादन] भावी पित्याचा सहभाग

[संपादन] जन्म

नवजात बालक

स्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा/बालकांचा जन्म होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात. नैसर्गिक प्रसूती योनी मार्गातुन होते परंतु ज्यावेळी ती शक्य नसते त्यावेळी पोटावर ऑपरेशन करून बाळाची प्रसूती केली जाते या सीजेरियन सेक्शन ऑपरेशन म्हणतात.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये