पोहे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनुक्रमणिका

[संपादन] साहित्य

  1. जाड पोहे
  2. चिरलेले कांद्याचे काप
  3. चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  4. हळद
  5. मोहरी/जिरे
  6. तेल(गोडेतेल)
  7. मिठ

[संपादन] पूर्व तयारी

आलुपोहे

पोहे क‍रण्या अगोद‍र पोहयांचे दोन प्रकार असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. १} जाड पोहे २} पातळ पोहे

पोहे निवडून व पाण्याने भिजवून रोळी मध्ये काढून घ्यावे म्हणजे पाणी निथळून जाईल. जाड पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}जास्त मारावा लागतो. आणि पातळ पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}कमी मारावा लागतो.

[संपादन] कृती

कढई मध्ये तेल टाकुन त्यात मोहरी/जिरे टाकावे.तडतडल्यानंतर त्यात चिरलेले कांद्याचे काप टाका व नंतर थोड्यावेळाने त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका. मिरच्या थोड्या पांढुरक्या झाल्यावर नंतर हळद व भिजवलेले पोहे टाका. हळदीचा समान रंग येईपर्यंत परता.

[संपादन] सजावट

खायला देताना कोथिंबिर व खोबऱ्याचा किस टाकुन द्यावे.

[संपादन] इतर माहिती

कांद्याचे प्रमाण थोडे कमी करून त्यात उकडलेले/कापा करून थोडे तळलेले आलु टाकल्यास हे आलुपोहे होतात.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये