पाश्चरायझेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दूध ठरावीक काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते व लगेच एकदम थंड करण्यात येते. या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक जीवाणू नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच दूधाचे आयुष्यमानही वाढते.

पाश्चरायझेशन या प्रक्रियेचा शोध लुई पाश्चर या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाने लावला. यामुळेच या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून पाश्चरायझेशन असे म्हणतात.