Jump to content

पत्र सूचना कार्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पत्र सूचना कार्यालयचे प्रमुख हे भारत सरकारचे अधिकृत प्रवक्ते देखील आहेत आणि त्यांच्याकडे प्रधान महासंचालक (विशेष सचिव समतुल्य) पद आहे. हे पद सध्या श्री. जयदीप भटनागर IIS जे माहिती व प्रसारण मंत्रालय, भारतच्या अंतर्गत पत्र सूचना कार्यालयचे २९ वे प्रमुख आहेत.[१]

इतिहास[संपादन]

पत्र सूचना कार्यालयची स्थापना ही जून 1919 मध्ये ब्रिटीश सरकारच्या काळात गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक लहान सेल म्हणून करण्यात आली. ब्रिटीश संसदेसमोर भारताविषयीचा अहवाल तयार करणे हे त्याचे मुख्य कार्य होते. ते तेव्हा शिमला या ठिकाणी होते.1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर कार्यालयची अनेक वेळा पुनर्रचना करण्यात आली आहे. सूचना कार्यालय खालील बाबींवर इलेक्ट्रॉनिक , मुद्रण आणि वेब प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी प्रेसला अधिकृत निवेदन, वैशिष्ट्ये, छायाचित्रे, व्हिज्युअल माहिती आणि चित्रफीत जारी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "जयदीप भटनागर यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला". pib.gov.in. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]