नथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नथ

नथ हे स्त्रियांचे नाकात घालण्याचे एक सोन्याचे आभूषण आहे. नथ किंवा "कारवारी नथ" ही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या मराठी मुलखांत खूप प्रचलित आहे. या आभूषणाला मोती जडवलेले असतात काही मोती लाल रंगाचे असतात.नथीमध्ये बहुधा दुर्मिळ असे "बसरा मोती" असतात. नथ सुशोभित करण्यासाठी मोत्यासोबत पाचू आणि माणिक ही रत्‍नेदेखील वापरली जातात.पूर्वीपासून स्त्रिया नाकात नथ घालतात. नथ हा अलंकार स्त्रियांचा अव्दिव्हा दागिना आहे. पिवळेधम्मक मोती आणि लाल, हिरव्या आणि पांढऱ्या हिऱ्यांनी आणि मोत्यांनी गुंफलेला एक अप्रतिम दागिना म्हणजे नथ. मात्र काळानुरूप नथीचे आकार आणि प्रकार यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या आकाराच्या आणि जड वजनाच्या नथी वापरल्या जायच्या. आता सुधा या दागिन्याला तेवढेच महत्व लाभले आहे.

संदर्भ[संपादन]

http://jewellery-indiaa.blogspot.in/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html (भारतीय आभूषणांबाबत माहिती.)