नटू वांगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नटू वांगम हे भरतनाट्यम या भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये वापरण्यात येणारे वाद्य आहे. हे वाद्य टाळ या सारखे असते. नृत्य सादर करत असताना नर्तक किंवा नर्तिकेला ताल देण्यासाठी हे वाद्य वाजवले जाते. भरतनाट्यममध्ये ताल, लय, संगीत यांना महत्त्वाचे स्थान आहे. भाव, राग आणि ताल यांच्या माध्यमातून नृत्य सादर केले जाते.