दिनकर शिलेदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिनकर शिलेदार हे एक मराठी लेखक, कवी आणि प्रकाशक आहेत. दिनमार्क पब्लिकेशन्स ही त्यांची पुणे येथील प्रकाशनसंस्था आहे. या संस्थेची स्थापना त्यांनी १९९७ च्या दिवाळीत केली. 'मानवाधिकार चळवळ एक मुक्त चिंतन' हे मानवाधिकारावरील मराठीतले पहिले पुस्तक प्रकाशित करून दिनमार्क पब्लिकेशन्सने प्रकाशन क्षेत्रात पाऊल टाकले. या संस्थेतर्फे इ.स. १९९९पासून दरवर्षी ’आपले छंद’ हा संग्राह्य दिवाळी अंक निघतो. या अंकाला १३ वर्षात ३४ पुरस्कार मिळाले आहेत.

दिनकर शिलेदार हे पुण्यातील लक्ष्मी रोडवरील दुकानदारांकडून जाहिराती मिळवत आणि डेक्कन क्वीनने मुंबईला जाऊन वृत्तपत्रांच्या कार्यालयांत सुपूर्द करत. त्या जाहिराती आठवडाभराने किंवा १५ दिवसांनी प्रसिद्ध होत. या कामासाठी वृत्तपत्रे कमिशन देत नसत आणि जाहिरातदारही वृत्तपत्रे कमिशन देतीलच अशा समजुतीने बिलातले ५ टक्के कापून उरलेले हातात ठेवीत. एकदा दिनकर शिलेदारांची गर्भवती पत्‍नी मुंबईच्या एका वृत्तपत्राच्या कार्यालयात जाहिराती केव्हा प्रसिद्ध होतील याची चौकशी करण्यासाठी गेली असताना, तिथल्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्हने तिची परिस्थिती जाणली, आणि त्या दिवसापासून त्या वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीमध्ये शिलेदारांनी आणलेल्या जाहिराती नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागल्या.

शिलेदार यांची स्वतःची मोनार्क ॲडव्हर्टायझिंग नावाची जाहिरात कंपनी आहे. शिवाय ते ’रामा' (रीजनल ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन) या जाहिरातदारांच्या संघटनचे सतत दोन वर्षे अध्यक्ष राहिले आहेत.

दिनकर शिलेदार यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • कोंदण (२०१५)
  • ग्राफिटी ट्रॅफिक अवेअरनेस
  • तृणाकुर (काव्यसंग्रह)
  • दुर्वांकुर (कथासंग्रह)
  • मोरपंखी (२०१५)
  • राजमुद्रा (२०१५)