तंत्रज्ञान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
तंत्रज्ञान (इंग्लिश: Technology, टेक्नॉलजी) म्हणजे अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय. प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |