डच ईस्ट इंडीझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डच ईस्ट इंडीझ किंवा नेदरलँड्स ईस्ट इंडीझ (डच:नेडरलँड्स-इंडिये; इंडोनेशियन:हिंदिया-बेलांडा) हे अठराव्या व एकणिसाव्या शतकातील आत्ताच्या इंडोनेशियाच्या प्रदेशाचे नाव होते. हा प्रदेश डच ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्या खाली होता. इ.स. १८००मध्ये नेदरलँड्सच्या सरकारने हा प्रदेश आपल्या थेट अखत्यारीत आणला व दुसऱ्या महायुद्धानंतर त्यातूनच इंडोनेशियाचे राष्ट्र निर्माण झाले.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.