झोडगे
झोडगे हे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वसलेले गाव आहे. गावाचे क्षेत्रफळ सुमारे ५ वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे १५,००० आहे.
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
?झोडगे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मालेगाव |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
स्थान
[संपादन]झोडगे हे गाव नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव या तालुक्यात मालेगाव या शहरापासून राष्ट्रीय महामार्ग ३ या मार्गावर २१ किलोमीटर अंतरावर रस्त्यावर वसलेले आहे.
हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
लोकसंख्या
[संपादन]झोडगे लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने तालुक्यातील एक मोठे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावात १५२८ घरे आहेत तर गावाची एकूण लोकसंख्या ७४४२ इतकी आहे. त्यापैकी ३८६८ पुरुष तर ३५७४ महिला. ० ते सहा वयोगटातील एकूण बालकांची संख्या १००१ (५४९ मुले,४५२ मुली) ईतकी आहे.
प्रशासन
[संपादन]इथला कारभार हा ग्रामपंचायती मार्फत चालतो. गावाचा कारभार भारतीय राज्यघटना व पंचायती राज कायद्याप्रमाणे सरपंच पाहतात.झोडगे हे गाव मालेगाव बाह्य विधानसभा तर धुळे लोकसभा क्षेत्रात येते.
शिक्षण
[संपादन]या गावात प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा आहे व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकरीता व्यवस्था आहे. तसेच लहान मुलांसाठी आंगणवाडी आहे. महाविद्यालयीन शिक्षण मालेगाव किंवा नाशिक यांपैकी कुठल्याही एका ठिकाणाहून पूर्ण केले जाते. २०११ च्या जनगणनेनुसार गावातील साक्षरता दर ८१.९७% हा (पुरुष ८७.९५% ; महिला ७५.६२%) इतका आहे. हा राज्याच्या साक्षरता दराच्या ८२.३४%च्या तुलनेत कमी आहे.
आरोग्य
[संपादन]गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रामार्फत सरकारी आरोग्य योजनांची अंमलबजावणी केली जाते. गावात खाजगी इस्पितळे ही आहेत.
व्यवसाय
[संपादन]शेती हा गावातील प्रमुख व्यवसाय आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय ही केला जातो. हे बाजारपेठेचे गाव आहे. पंचक्रोशीतील व तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे.
पर्यटनस्थळे
[संपादन]माणकेश्वर शिवालय
[संपादन]गावाच्या दक्षिणेस माणकेश्वर शिवालय या नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीची बांधणी असलेले मध्ययुगीन मंदिर आहे.
संदर्भ
[संपादन]1. https://nashik.gov.in/mr/%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%87/ 2. https://www.census2011.co.in/data/village/550203-zodge-maharashtra.html