चाल (भौतिकी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चाल (भौतिकशास्त्र) या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg

भौतिकशास्त्रानुसार चाल[१] (मराठी नामभेद: द्रुतता[१]; इंग्लिश: Speed, स्पीड) म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थानांतराचा दर होय. वेग या भौतिक राशीपेक्षा चाल वेगळी ठरते - कारण चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते, तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे चाल ही राशी अदिश ठरते, तर वेग सदिश ठरतो.

उदा.: "५ मीटर प्रतिसेकंद" हे मापन अदिश ठरते; कारण ते फक्त वस्तूची चाल दर्शवते. मात्र "पूर्वेकडे ५ मीटर प्रतिसेकंद" असे मापन सदिश ठरते.

व्याख्या[संपादन]

एखाद्या वस्तूची चाल v, म्हणजेच v या वेगाचे "परिमाण", ही त्या वस्तूच्या r स्थितीचे काळावरील विकलज होय :

v = \left|\mathbf v\right| = \left|\dot {\mathbf r}\right| = \left|\frac{d\mathbf r}{dt}\right|.

म्हणजे एखाद्या वस्तूने t एवढ्या काळात s एवढे अंतर कापले असल्यास, त्या वस्तूची चाल s या स्थानांतराच्या काळावरील विकलजाएवढी असते :

v = \frac{ds}{dt}.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ (इ.स. १९८८) भौतिकशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पृ. ९७२. (मराठी मजकूर) 
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.