चर्चा:सुशीलकुमार शिंदे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असहमती

बऱ्याच विनोदवीरांना विनोद कुठे थांबवावा कळत नाही म्हणून काही विनोदांवर वाद होतात.पण ज्या विधानात तथ्य नसते, ती विधाने वादग्रस्त म्हणवण्याच्या लायकी पेक्षा विनोद या प्रकारातच मोडतात. विनोद हा विनोदच असतो . विनोदांना वादग्रस्थ विधान म्हणून विभाग शिर्षकातील बदलाशी मी असहमत आहे. - रश्मी

विपी वरील लिखाण निष्पक्षपाती हवे. हा विपीच्या पाच आधारस्तंभापैकी एक स्तंभ आहे. या लेखात नमूद केलेली विनोद / विधाने ही सुशीलकुमार शिंदे यांनी खासदार / गृहमंत्री / एक राष्ट्रीय नेते या नात्याने केलेली विधाने आहेत. हि विधाने वादग्रस्त ठरली, आपल्याला ती विनोदी वाटली हा आपला वैयक्तिक दृष्टीकोन असू शकतो.
शिंदे हे काही विनोदी कलाकार नाहीत, व विनोद करणे हा त्यांचा पेशा नाही, त्यामुळे या विभागाला विनोदी विधाने हे शिर्षक उचित वाटत नाही. या विधानांनी वाद झाला व शिंदे याच्यावर टीका देखील झाली, त्यामुळे हि सर्व विधाने वादग्रस्त ठरली हे निश्चित, परंतु ती विनोदी आहे किंवा नाही हे वाचकांनी ठरवावे असे वाटते.
विपी वरील लेखन शैली बाबत आणखी माहिती साठी हा लेख वाचावा. आपण विलासराव देशमुख हा लेख देखील संदर्भाखातर वाचू शकता.
आपल्याला अजून काही शंका असल्यास विपी वरील जुन्या जाणत्या सदस्यांचे, जसे अभय, माहितगार, जे, संकल्प, अभिजित साठे याचे मार्गदर्शन घेऊ शकता.
कळावे. - प्रबोध (चर्चा) ११:४७, २३ जानेवारी २०१३ (IST)[reply]