चर्चा:शैला कामत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात असलेला परंतु त्याच्याशी थेट संबंध नसलेलाल मजकूर हरवू नये म्हणून येथे हलविला. यातील भाग योग्य त्या लेखांत हलवावे.

अभय नातू (चर्चा) २२:३६, ४ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]


अर्थाने मराठीत पहिले प्रवासवर्णन म्हणजे गोडसे भटजींनी लिहिलेले माझा प्रवास’ (१८८७), त्यानंतर रावजी भवानराव पावगी यांचे ’विलायतेचा प्रवास’ हे दोन भागांतले पुस्तक (१८८९, १८९२), माझी विलायतची यात्रा (गोविंद चिमणाजी भाटे-१९३४), आणि धुक्यातून ताऱ्याकडे (अनंत काणेकर-१९४०), ही पुस्तके प्रसिद्ध झाली. अनंत काणेकरांच्या पुस्तकाने प्रवासवर्णन ललित अंगाने कसे लिहिता येते ते मराठीच्या वाचकांना कळाले. पु.ल.देशपांडे यांच्या अपूर्वाई(१९६०) आणि पूर्वरंग(१९६३) या पुस्तकांनी तर लोकप्रियतेची कमाल केली. डॉ. मीना प्रभु यांच्या परदेशी प्रवासवर्णनाच्या पुस्तकांनी ही परंपरा चालूच ठेवली आहे.

असे असले तरी, देशान्तर्गत प्रवास करून प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारी, आणि तीही भरपूर पुस्तके लिहिणाऱ्या शैला कामत या सर्व लेखकांत अनोख्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या विसापेक्षा जास्त असावी. त्यांची काही पुस्तके पुढील यादीत सापडतील :