चर्चा:विजयादशमी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी साधना करते आणि पूर्ण ज्ञान प्राप्त करून दिग्विजय करायला निघते असाही विचार यामागे असावा. सीमा ओलांडणे म्हणजे कुंठित विचाराना अभ्यासपूर्वक ओलांडून जाणे असाही आशय यामागे असावा असे वाटते.आर्या जोशी (चर्चा) आधुनिक कालाचा विचार करता आपट्याची पाने तोडणे हे पर्यावरण दृष्ट्या योग्य नाही असेही जाणवते.आर्या जोशी


@आर्या जोशी:

यात वेगवेगळी मतांतरे व त्यामागच्या कथा/भावना असू शकतात. कोणत्याही पारंपारिक गोष्टीमागचे कारण शोधायचे झाले तर प्राचिन काळात जावे लागते. तेंव्हाचे राहणीमान, त्या काळची परिस्थिती वगैरे लक्षात घ्यावी लागत्ते. पूर्वी राज्य असायचे. वर्षा ऋतुत खराब झालेल्या/ बुरशी लागलेल्या वस्तु साफसुफ करावयास काहीतरी उद्देश/ध्येय हवे म्हणून विजयादशमीस सिमोल्ल्ंघन ही रित ठेवण्यात आली असावी. मलातरी सबळ कारण हे वाटते कि वर्षा ऋतु संपलेला असतो, त्यायोगे आलेला बंदिस्तपणा(घराबाहेर जाणे) संपतो. त्यानंतरचा काळच शत्रुसाठीपण चढाई करण्यास योग्य असतो. त्यासाठी आपणपण जय्यत तयारीत असावे म्हणून शस्त्रपूजन,सिमोल्लंघन इत्यादी ठरविण्यात आले असावे. म्हणून शस्त्रे घासुन त्याची पूजा करुन वापरण्यास तयारीत ठेवणे असे कारण त्यामागे असावे.

पुढे येणाऱ्या थंडीच्या काळास सामना देण्यासाठी पण ही वेळ मुहूर्त म्हणून चांगली.(साधारणतः, पंचमीपासून थोडी थोडी थंडी सुरु होते.)त्याद्वारे अनायसे रपेट घडते.

अर्थातच, हा माझा तर्क व वैयक्तिक मत आहे.

वि. नरसीकर (चर्चा) १५:३४, १० ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

आपले म्हणणे व्यावाहारिक व योग्यच आहे.वस्तुत: धार्मिक परंपरा पाहिल्या तर त्यामध्ये सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब दिसून येतेच. धर्मशास्त्रात विजयादशमीला देवी सीमा ओलांडून बाहेर जाते असे मानले जाते. वस्तुत: मध्ययुगात आश्विन शु. प्रतिपदेला नवे वर्ष सुरु होत असे असे मानले जाते. त्यामुळे नव्या वर्षाच्या नव्या प्रेरणा असाही भाग असावा.आर्या जोशी (चर्चा)


बरोबर