चर्चा:राग आसावरी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या रागाचे (व ओडव आसावरी रागाचे) नाव आसावरी आहे कि असावरी?

अभय नातू २३:५५, १३ ऑक्टोबर २००८ (UTC)

आसावरी हे लेखन मराठीत जास्त प्रचलित आहे. कॅसेट-सीड्यांच्या कव्हरांवर आणि सांगितीक समीक्षणांमधून ’आसावरी’ असेच बहुतकरून लिहिल्याचे आठवते. असावरी असे लेखनही आता गूगलवर शोधल्यावर काही ठिकाणी प्रचलित असल्याचे दिसते. परंतु थोडाफार नामभेद बर्‍यांच नावांत आढळतो; उदा.: दरबारी कानडा/दरबारी कान्हडा, मालकंस/मालकौंस/मालकोस/मालकोश वगैरे. पण सहसा मराठीत प्रचलित असलेले नाव प्रधान ठेवावे.
कुणी गांधर्व महाविद्यालयाच्या मराठी पाठ्यपुस्तकांत खातरजमा करून बघितले तर बरे होईल; माझ्याकडे सध्या ही पुस्तके नाहीत.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:२२, १४ ऑक्टोबर २००८ (UTC)