Jump to content

चर्चा:पानशेत पूर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर[संपादन]

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य ते बदल करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) १०:०४, १४ मे २०२४ (IST)[reply]


एकोणवीसशे एकसष्ट सालच्या बारा जुलैला, पुण्यात हाःहाःकार उडाला. नुकतेच पानशेत धरण बांधून झाले होते. घाई घाईने पाणी साठवले होते असा प्रवाद आहे. काही असो, धरणाला काही तरी धोका आहे हा संशय नक्कीच आला होता. पण बारा जुलैला सकाळच्या वृत्तपत्रांत बातमी होती, ‘पानशेतचा धोका टळला’. अधिकृत आकड्यांप्रमाणे निदान एकोणतीस जण मृत्यु पावले, सव्वीस हजार कुटुंबांचे सामानसुमान वाहून गेले, छत्तीसशे दुकानांतील मालाची नासधूस झाली, बेचाळीस हजार पोती धान्य कुजून गेले. सर्वांना माहिती होते की पानशेतला लष्कराची कुमक मागवली होती. ते वाळूने भरलेली पोती धरणात ठासत होते. हे साधले नाही, आणि उजाडता-उजाडता धरणाला भगदाड पडले. हा पाण्याचा लोंढा पुण्यात पोचायला अडीच- तीन तास लागले. मग दुपारी खडकवासल्याचेही धरण फुटले; लोंढा आणखीच वाढला. आता पानशेतच्या, खडकवासल्याच्या इंजिनियरांजवळ टेलिफोन होता, लष्कराच्या लोकांपाशी बिनतारी संदेश देण्याचीही सुविधा होती. तरी लोकांना ह्या दोनही धरण फुटींची धोक्याची सूचना दिली गेली नव्हती.[१][२]


अभय नातू (चर्चा) १०:०४, १४ मे २०२४ (IST)[reply]

  1. ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-14 रोजी पाहिले.
  2. ^ "शिक्षणआनंदाची वर्षे." Loksatta. 2023-09-03. 2024-05-14 रोजी पाहिले.