चर्चा:निखिल फाटक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी भाषक व्यक्तींच्या लेखात रोमन लिपीतील त्यांच्या नावाचे लेखन नोंदवण्यात हशील आहे काय ?[संपादन]

या लेखात प्रस्तुत मराठी भाषक व्यक्तीच्या नावाचे रोमन लिपीतील लेखन Nikhil Phatak असे नोंदवण्यात आले आहे. तसे करायला हरकत नसली, तरीही सहसा मराठी भाषक समाजातील रोमन लिपीतील नामलेखनाचे संकेत मराठी वाचकांना माहीत असल्यामुळे माहितीची काही विशेष भर पडत नाही. याउलट ज्या व्यक्ती अमराठी भारतीय आहेत किंवा ज्या व्यक्ती परकीय भाषक समाजांतील आहेत, त्यांच्या नावाचे स्थानिक भाषेतील लेखन व काही केशींमध्ये (उदा.: दक्षिण भारतीय भाषक व्यक्तींबद्दल) रोमन लिपीतील लेखन नोंदवले जाते याचे कारण ती माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवरील मराठी ज्ञानकोशाला उपयुक्त ठरते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:१३, २ जून २०११ (UTC)

काही दिवसांपूर्वी मी रोमन मधील लेखांची एक यादी मराठी विकीपेडिया वरून काढली आणि या नावांची येथे खरच आवश्यकता आहे काय असे विचारले होते. माहितगार यांचे म्हणणे असे की अनेक लोक रोमन टाईप करून जेव्हा "इंग्रजी गुगल शोध" घेतात तेव्हा त्यांना "मराठी विकीपेडिया" ची लिंक सापडते आणि या नावाचा लेख सापडू शकतो कारण तो रोमन नावावरून देवनागरी नावावर स्थानांतरीत केलेला असतो. जेणेकरून अनेक लोक मराठी विकीपेडियाकडे वळू शकतील आणि त्याचे वाचक आणि नंतर संपादक होऊ शकतील. मला त्यांचा हा मुद्दा पटतो आहे. त्याचबरोबर मी मराठी लेखामधेच सुरुवातीला जर रोमन मधील नाव मराठी विकीपेडिया घातले आणि नंतर 'इंग्रजी गुगल' मध्ये सापडते का हे पाहत होतो. पण मला त्यात फारसे यश आले नाही. तुला काही अजून मार्ग सापडेल का?

मंदार कुलकर्णी १७:२९, २ जून २०११ (UTC)

>>माहितगार यांचे म्हणणे असे की......<<
म्हणणे कोठे मांडले/सांगितले त्याचा दुवा येथे असावा किंवा त्यांनी येथेच दुजोरा द्यावा. वाचणारांना कोठे (!) सांगितले ते शोधत फिरावे लागणार नाही. --संतोष दहिवळ (चर्चा) ००:४५, १४ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]