चर्चा:नायाग्रा धबधबा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेख नाव[संपादन]

@अभय नातू, नमस्कार, सदरील धबधबा तसेच नदीचे नाव गूगलवर मराठीत नायगारा असे दिसून येत आहे. हिंदी मध्ये मात्र नियाग्रा असे आहे. नायाग्रा असे शोधले असता परिणाम दिसून येत नाहीत.-संतोष गोरे ( 💬 ) ०७:२३, २७ जानेवारी २०२४ (IST)[reply]

या शब्दाचे इंग्लिश शुद्धलेखन जरी Niagara असले तरी त्याचा उच्चार /naɪˈæɡərə/ (नै-ॲ-गह्-रह् किंवा नै-ॲ-ग्रह्) असा आहे. त्याचे सगळ्यात जवळचे वर्णांकन आणि विशेषतः स्थानिक उच्चार नायाग्रा असे होईल.
असे असता आपल्या संकेतानुसार स्थानिक/मूळ उच्चाराच्या सगळ्या जवळचे शुद्धलेखन शीर्षकात ठेवून इतर उच्चारांकडून पुनर्निर्देशन असावे (प्रत्येक संकेताला असतात तसे यालाही अपवाद आहेतच.)
अभय नातू (चर्चा) २३:२५, २७ जानेवारी २०२४ (IST)[reply]
ता.क. परदेशी शब्दांचे (विशेषतः विशेषनामांचे) पूर्वापार चालत आलेले चुकीचे शुद्धलेखन पुढे चालवू नये आणि शक्य तेथे दुरुस्त करावे असे माझे आग्रहाचे मत आहे.
अभय नातू (चर्चा) २३:२६, २७ जानेवारी २०२४ (IST)[reply]