चर्चा:तांबट (पक्षी)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला हा मजकूर या लेखात समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) ०३:५३, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


Coppersmith Barbet (Megalaima haemacephala) in Hyderabad W IMG 7079
Coppersmith Barbet (Megalaima haemacephala) in Hyderabad W IMG 8287

मराठी नाव[संपादन]

तांबट,पुकपुक,पुक्पुक्या,सोनार,जूकटुक

इंग्रजी नाव[संपादन]

Crimsonbreasted Barbet or Coppersmith (क्रीमझनब्रेस्टेड बर्बेट किवा काॅपरस्मिथ )

शास्ञीय नाव[संपादन]

megalaima haemacephala (मेगालायमा हिमॅसेफाला)

आकार[संपादन]

१७ सेंमी.

माहिती[संपादन]

तांब्याच्या भांड्यावर ठोके देणाऱ्या तांबट आळीमधल्या तांबटाचा जसा 'टक टक'आवाज येतो तसा एकसुरी आवाज हे पक्षी झाडावर बसून करतात.या पक्ष्याच्या आवाजात दूरवर पोहचण्याचा गुण असतो.कधी कधी आपण एखाद्या वडाच्या झाडाखाली उभे असताना झाडावरून तांबटाचा आवाज येत असतो.आपल्याला वाटत की हा आवाज खूप लाबं येतोय.वास्तविक हिरव्या झाडांमध्ये मिळून मिसळून जाणारा तांबट आपल्यापासून अगदी जवळ असतो.हा एकांडा शिलेदार आहे.या पक्षाच्या गळ्यावर आणि डोळ्याभोवती पिवळा रंग असतो.पोटाच्या बाजूस रंग पंधरट होऊन त्यावर हिरव्या रेगा असतात.छाती आणि कपाळावर लाल रंगाची पिंस असतात.काळी मजबूत चोच आणि तळाशी मिशा अशी हि तांबटा ची स्वारी.वड,पिंपळ या झाडाची फळं हे मुख्य अन्न.कधीकधी उडणारे किडे किंवा फुलपाखरंही चवीला म्हणून चालतात.तांबट पक्षाचा आवाज उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त एेकू येतो.हा फळझाडांचा वारकरी आहे.लाल रंगाचा 'टिळा लावून तो वाड,पिंपळ,अंजीर,जाभूळ अशा झाडांना भेट देत असतो.जानेवारी ते जून या काळात तांबट पिल्लं वाढवतो.पांगारा शेवगा काटेसावर,शिरीष,आंबा,गुलमोहोर,चिंच या झाडांच्या वठलेल्या फांद्यामध्ये चोचीनं खोदून घराटं केलं जात.घर टयात जाण्यासाठी नळीसारखा प्रवेशमार्ग असतो.या नळीच्या शेवटी अंडयाची कोठी असते.तांबटाचं घरटं नेहमी फांदीच्या खालच्या बाजूला असतं.याचं कारण काय असेल?

संदर्भ[संपादन]

दोस्ती करूया पक्षाशी:श्री.किरण पुरंदरे.