ग्वाल्हेर संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिंदे घराण्याचा राजध्वज
ग्वाल्हेर राज्याचे चलन

ग्वाल्हेरचे संस्थान हे मराठा साम्राज्यातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्याचा निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हा या संस्थानाचा संस्थापक पुरुष होता. या संस्थानाची राजधानी पूर्वी उज्जैन होती, पण नंतर ग्वाल्हेर हेच राजधानीचे ठिकाण झाले.

ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांच्यापेक्षाही महादजी शिंदे प्रसिद्ध पावले. ते राणोजींचे सर्वात छोटे चिरंजीव होते. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले, तर महादजी शिंदे इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आले. या घराण्यातील शासक खालीलप्रमाणे :

  • जयाप्पाराव (इ.स १७५०-१७६१)
  • महादजी शिंदे (इ.स. १७६१-१७९४)
  • दौलतराव (इ.स. १७९४-१८४३)
  • बायजाबाई (दौलतरावांची विधवा पत्‍नी, इ.स. १८२७-१८३३)
  • जनकोजी (इ.स. १८८६-१९२५)
  • जयाजीराव (इ.स. १८४३-१८८६)
  • माधवराव (इ.स. १८८६-१९२५)
  • जिवाजीराव (इ.स. १९२५-१९४८).

माधवराव शिंदेज्योतिरादित्य शिंदे हे भारतीय प्रजासत्ताकातील राजकारणी याच घराण्यातील आहेत. ग्वाल्हेर संस्थानाचे अखेरचे संस्थानिक जिवाजीराव हे माधवराव शिंद्यांचे वडील होते.

इ.स. १८०३मध्ये दौलतरावाच्या नेतृत्वाखालील शिंद्यांचे सैन्य ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी लढताना पराभूत झाले. कालांतराने त्यांनी ब्रिटिशांशी समेट घडवून आपले संस्थान इ.स. १९४७ पर्यंत टिकवून ठेवले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.