खारकच्छ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्कमेनिस्तानाच्या कास्पियन समुद्रालगतच्या किनाऱ्यावरील "काराबोगाझ गोल" नावाच्या खारकच्छाचे विहंगम दृश्य

खारकच्छ[श १], किंवा खाजण[१], म्हणजे समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर वाळूचे संचयन होऊन निर्माण झालेले वाळूचे दांडे किंवा बांध या दोहोंमधील खाऱ्या पाण्याची पट्टी अथवा सरोवर होय [२].

वाळू, खडे, गाळ यांनी बनलेल्या जमिनीच्या अरुंद बांधामुळे आखाताचे किंवा उपसागराचे मुख बह्वंशी किंवा पूर्णपणे बंद झाले असल्यास जमिनीची पट्टी व मुख्य किनारा यांच्यामधील जलसाठ्यासही खारकच्छ म्हणून उल्लेखले जाते. काहीवेळा किनाऱ्यापासून काही अंतरावर उभ्या राहिलेल्या प्रवाळभित्तींमुळेही खारकच्छे बनतात [२]. खारकच्छला लगून (इंग्रजी), अनूप (संस्कृत), पश्चजल, समुद्रताल, कयाल (मल्याळम) आदि अन्य शब्द आहेत.

पारिभाषिक शब्दसूची[संपादन]

  1. खारकच्छ (इंग्लिश: Lagoon, लगून). अन्य नावे : खाजण, कायल

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. कुलकर्णी, एल.के. (इ.स. २००९). भूगोलकोश. राजहंस प्रकाशन. आय.एस.बी.एन. ९७८-८१-७४३४-४४४-१. (मराठी मजकूर) 
  2. २.० २.१ कुमठेकर,ज.ब.. खारकच्छ (मराठी विश्वकोशातील नोंद). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. (मराठी मजकूर) 
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.