खारकच्छ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(खाजण या पानावरून पुनर्निर्देशित)
तुर्कमेनिस्तानाच्या कास्पियन समुद्रालगतच्या किनाऱ्यावरील "काराबोगाझ गोल" नावाच्या खारकच्छाचे विहंगम दृश्य
खारकच्छ[श १], किंवा खाजण[१], म्हणजे समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर वाळूचे संचयन होऊन निर्माण झालेले वाळूचे दांडे किंवा बांध या दोहोंमधील खाऱ्या पाण्याची पट्टी अथवा सरोवर होय [२].
वाळू, खडे, गाळ यांनी बनलेल्या जमिनीच्या अरुंद बांधामुळे आखाताचे किंवा उपसागराचे मुख बह्वंशी किंवा पूर्णपणे बंद झाले असल्यास जमिनीची पट्टी व मुख्य किनारा यांच्यामधील जलसाठ्यासही खारकच्छ म्हणून उल्लेखले जाते. काहीवेळा किनाऱ्यापासून काही अंतरावर उभ्या राहिलेल्या प्रवाळभित्तींमुळेही खारकच्छे बनतात [२]. खारकच्छला लगून (इंग्रजी), अनूप (संस्कृत), पश्चजल, समुद्रताल, कयाल (मल्याळम) आदि अन्य शब्द आहेत.
पारिभाषिक शब्दसूची [संपादन]
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ कुलकर्णी, एल.के. (इ.स. २००९). भूगोलकोश. राजहंस प्रकाशन. आय.एस.बी.एन. ९७८-८१-७४३४-४४४-१. (मराठी मजकूर)
- ↑ २.० २.१ कुमठेकर,ज.ब.. खारकच्छ (मराठी विश्वकोशातील नोंद). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. (मराठी मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |