खंड्या
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| शास्त्रीय नाव | (Halcyon smyrnensis) |
|---|---|
| कुळ | धीवराद्य (Halcyonidae) |
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | व्हाईट थ्रोतेड किंगफिशर (White-throated Kingfisher) |
| संस्कृत | चंद्रकांत |
| हिंदी | श्वेतकण्ठ कौड़िल्ला |
खंड्या किव्हा किलकिल्या(en White Breasted Kingfisher) हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे.
खंड्या हे सामान्य नाम असून या पक्षाच्या विविध जातींपैकी पांढर्या छातीच्या खंड्याला नुसते खंड्या या नावाने ओळखतात. याच्या इतर जातभाईंची नावे लहान खंड्या (Small Blue), कवडा खंड्या (Indian Pied), काळ्या डोक्याचा खंड्या (Black Capped), तिबोटी खंड्या (Indian Threetoed), घोंगी खंड्या (Brownheaded Storkbilled), मलबारी खंड्या (Malabar Whitecollared) अशी आहेत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |