कैवारी (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कैवारी
प्रकारवृत्तपत्र

मुख्य संपादकदिनकरराव जवळकर, गणपतराव जाधव
स्थापना१९२८
भाषामराठी
प्रकाशन बंद१९३०
मुख्यालयभारत महाराष्ट्र, भारत


कैवारी हे वृत्तपत्र मराठी भाषेतील स्वातंत्रपूर्व काळातील वृत्तपत्र आहे. दिनकरराव जवळकरांनी या वृत्तपत्राची सुरुवात इ.स.१९२८ च्या प्रारंभी केली. ब्राम्हणेतर पक्षाची बाजू मांडण्यासाठी कैवारी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.

इतिहास[संपादन]

इ.स.१९२८ च्या प्रारंभी कैवारी या वृत्तपत्राची सुरुवात झाली. सायमन कमिशनच्या नेमणुकीमुळे ज्या राजकीय उलाढाली झाल्या त्यामध्ये ब्राम्हणेतर पक्षाची बाजू मांडण्यासाठी कैवारी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. जवळकारणी कैवारीतून अनेक तत्कालीन विषयाची मांडणी केली. कैवारीचे कामकाज पाहण्यासाठी सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली होती. जवळकरांनी मुंबई गिरणी कामगार युनियनचे नेते आणि कम्युनिस्ट नेत्यांविरुद्ध नंतरच्या कालखंडात टीकेची झोडउठवली होती. यांत डांगे, निमकर,जोगळेकर-पेंडसे व घंटे आदी नेत्यांचा समावेश होता. ब्राम्हणेतर कामगार नेते अर्जुन आळवे आणि गोविंद कासले तसेच भास्करराव जाधव यांनी जवळकरांच्या भूमिकेला पाठींबा दिला. कैवारीत ब्राम्हणेतर परिषदांचे अहवाल छापले जात होते. ब्राम्हणेतर पक्ष नेत्यांचे मतभेद, मुंबई कायदेमंडळातील कामकाज इत्यादी विषयी वृत्तही दिले जात होते. २७ मार्च १९२७ रोजी जवळकर इंग्लंडला गेले आणि कैवारी वृत्तपत्राची जबाबदारी गणपतराव जाधव यांच्याकडे आली. अंतर्गत मतभेद आणि भांडवलशाहीच्या विळख्यात अडकून कैवारी वृत्तपत्र इ.स.१९३० साली बंद पडले.[१][२]

रचना व स्वरूप[संपादन]

प्रारंभी कैवारी आठ पाणी होते व नंतर बरा पानी झाले. कैवारीमध्ये अग्रलेख, स्फुटविचार, वर्तमानसार, जगातील आश्चर्य, चित्रपट, कला, संपूर्ण गोष्ट, पोंच व अभिप्राय, कराची गोमंतक, नागपूर, कोल्हापूरचे वार्तापत्र,अफगाणिस्तानातील घडामोडी,तात्यापंतोजींच्या छड्या, अशी विविध सदरे असत.

संपादक आणि सल्लागार मंडळ[संपादन]

दिनकरराव जवळकरांच्या संपादकत्वाखाली कैवारी वृत्तपत्र सुरू झाले. काही वर्षे जवळकर तर काही वर्षे गणपतराव जाधव संपादक होते. यासाठी सल्लागार मंडळ तयार करण्यात आले होते. सल्लागार मंडळाचे अध्यक्ष भास्करराव जाधव, उपाध्यक्ष बाबुराव जेधे हे होते. सल्लागार मंडळात केशवराव जेधे,रामचंद्र वंडेकर,शंकरराव झुंजारराव,गोविंदराव शिंदे,रामचंद्र तडसरकर,माधवराव शितोडे,नारायण कदम हे होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ लेले, रा.के. (२००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.
  2. ^ चिंचोलकर, रविंद्र. "स्वातंत्र्यपूर्व काळातील बहुजनाची वृतपत्रे". http://shodhganga.inflibnet.ac.in. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)