केरळ राज्यातील खाद्यसंस्कृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


खाद्य संस्कृती[संपादन][संपादन]

केरळात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्न प्रकारांचा समावेश होतो.मासे,कोंबडी आणि अन्य मांसप्रकार येथे खाल्ले जातात.मसाल्यांच्या पदार्थांचा वापर अन्न प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर केला जातो.भात हा अन्नाचा महत्त्वाचा घटक असून दिवसाच्या कोणत्याही वेली ते खाला जातो.न्यःरीचे मुख्य पदार्थ तांदळापासून केले जातात ज्यामध्ये इडली, पुत्तू,अप्पम,इडीअप्पम ,वडा यांचा समावेश होतो.चटणी, कडल, पायसम, चिकन करी , माशांची आमटी,रस्सम यासारख्या पदार्थांचा आस्वाद या जोडीने घेतला जातो.सध्या हा शाकाहारी भोजनाचा प्रकार असून ते केळीच्या पानावर वाढले जाते. या जेवणाच्या शेवटी गोड खीर म्हणजे पायसम खाल्ली जाते.मधल्या वेळच्या खाण्याच्या चटकदार पदार्थात केळ्याचे वेफर्स यासारखे पदार्थ येतात.मांसाहारी पदार्थांमध्येही येथे वैविध्य आढळते.चहासोबत केळीपासून तयार केलेली भजी आस्वादाने खाल्ली जातात. चहाचे मळे उत्तम प्रतीचे आहेत.