कृष्णाजी गोपाळ कर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृष्णाजी गोपाळ कर्वे (इ.स. १८८७; नाशिक, महाराष्ट्र - एप्रिल १९, इ.स. १९१०; ठाणे, महाराष्ट्र) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक होता. महाराष्ट्रातल्या नाशिक शहरातील अभिनव भारत संघटना नावाच्या गुप्त क्रांतिकारक संघटनेचा तो सदस्य होता. डिसेंबर, इ.स. १९०९ मध्ये नाशकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या अनंत कान्हेरे याने केलेल्या हत्येच्या खटल्यात यालाही फाशीची शिक्षा झाली. १९ एप्रिल, इ.स. १९१० रोजी ठाणे तुरुंगात त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली. ठाणे तुरुंगात सध्या याचे स्मारक आहे.