आनाक्रेऑन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनाक्रेऑन (सु. ५८२ – सु. ४८५ इ.स.पू.) एक ग्रीक भावकवी. जन्म आशिया मायनर मधील टीऑस या लहानशा बेटावर. पर्शियन आक्रमण थांबविण्यासाठी स्थापित झालेल्या इऑनियन लीगच्या बारा शहरांपैकी टीऑस हे एक शहर होते. आशिया मायनर मधील ग्रीक राज्यांवर पर्शियनांनी हल्ले सुरू केल्यानंतर इ.स. पू.सु. ५४५ मध्ये तो थ्रेसमधील ॲब्डिरा येथे आला. त्यानंतर काही काळ तो सेमॉस बेटावर पोलिक्राटीझच्या दरबारी होता. तो पोलिक्राटीझचा शिक्षक होता असे म्हटले जाते. त्याच्या संरक्षणाच्या बदल्यात आनाक्रेऑन अथेन्स येथे गेला आणि हिप्परकसच्या संरक्षणात त्याने लेखन केले. हिप्परकसच्या मृत्यूनंतर आनाक्रेऑन थेल्सली ला गेला असावेत, तेऑस येथे त्यांचे थडगे सापडले तिथे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

त्यांच्या महान प्रशंसकांपैकी एक व सहगीतकार कवी होरेस याच्याप्रमाणे आनाक्रेऑनचे लिखाण समाजासाठी होते. बराच काळ तो अथेन्समध्ये लोकप्रिय होता. त्याचा मित्र पुरीकल्स याचा पिता झांथीपस याच्या समवेत आनाक्रेऑनचा पुतळा अथेन्समध्ये आहे. टिओसच्या कित्येक नाण्यांवर तो हातात एक वाद्य ठेवून, कधी बसलेला, कधी उभा राहून प्रतिनिधित्व करतो. सबिन जिल्ह्यात १८३५ साली मार्बल मध्ये बनविलेला पुतळा सापडला आणि गॅलरिया बोर्गीझमध्ये संगमरवरी पुतळा सापडला आणि गॅलरीया बोर्गीझमध्ये संगमरवरी मूर्ती सापडली ती आनाक्रेऑनचे प्रतिनिधित्व करते असे म्हटले जाते.

आनाक्रेऑनने त्याची सर्व कविता प्राचीन आयनिक बोली मध्ये लिहिली. त्याची कविता गेय व अभिनय करता येण्याजोगी प्रारंभिक काळातील गीतांप्रमाणेच आहे. गीते हलकीफुलकी, खोडकर स्वरुपाची आहेत. त्याचे श्लोक/स्तोत्रे एकट्याने म्हणण्यायोग्य आहेत; कोरसमध्ये शक्य होत नाही. ग्रीक कवितेच्या परंपरेप्रमाणे ती मीटरवर रचलेली कविता होती. छंदात्मक कवितेची रचना श्लोकाच्या ओळीत आणि ध्वन्यात्मक वैशिष्ट्यांच्या नमुन्यात बनते. आजकालच्या सर्व ग्रीक कवितांप्रमाणे आनाक्रेऑनच्या काव्यातील ध्वन्यात्मक नमुना उच्च आणि खालच्या स्वरांच्या ध्वनीसंरचनेत आढळतो. आयनिक बोलीतील अंतर्गत लयही कवितागायनाला सुश्राव्य करते. आनाक्रेऑनच्या कविता आनाक्रिएंटिस मीटरमध्ये आहेत. मीटर मधील या छोट्या शैलीतील कवितेला ग्रीक भाषा योग्य आहे; परंतु श्लोक सहजगत्या इंग्रजीत भाषांतरीत होत नाहीत.

प्रेम आणि मदिरा हे त्यांचे विषय, प्रेम, मोह, निराशा, राजकारण, उत्सव. उत्सव आणि दररोजच्या माणसांच्या आणि जीवनावरील निरीक्षणाच्या सार्वत्रिक विषयांना आनाक्रेऑनच्या कवितांनी स्पर्श केला. वाचक श्रोत्यांना अनेक पिढ्यांसाठी आनंदी ठेवण्यास या कवितांनी मदत केली. त्याची व्यापक लोकप्रियता असंख्य अनुकरण करणाऱ्यांना प्रेरित करते. त्याच्या कवितात भावनेची सखोलता फारशी आढळत नाही; परंतु पारदर्शक अभिव्यक्ती अवश्य आहे. त्याचे फार मोठ्या प्रमाणात अनुकरण झाले. अशा अनुकरण करून रचलेल्या सु. ६० कवितांचा संग्रह ऑनाक्रेआँटिआ  ह्या नावाने ओळखला जातो. योहान, व्हिल्हेल्म, लूटव्हिख ग्लाइम, योहान पेटर, ऊट्स, योहान निकोलाउस ग्योटझ, व्हिल्हेल्म समलर, एवाड फोन क्लाइस्ट ह्या आनाक्रेआँटिक कवींनी इंद्रियानुभवांचे मोल मान्य केले असले तरी बुद्धीला डावलेले नाही

आनाक्रेऑन भजन संगीतकार म्हणून ओळखला जात असे. तसेच बॅचलियन आणि ॲमॅटरी गीतांची प्रतिष्ठा त्याच्या नावाशी संबंधित होती. अटेमिस आणि डायओनिअस अनुक्रमे आठ आणि अकरा ओळींनी बनवलेली स्तोत्रे त्याच्या साहित्याचा निर्विवाद अंश आहेत. परंतु अफ्रोडाइट, इरोस, डायओनियस यासारख्या देवतांवर लिहिलेले काव्य आनाक्रेऑनच्या गीतांतील सुरांमुळे चुकीचे अंदाज बांधले आहेत. आनाक्रेऑनच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित साहित्य लिहिले गेले. त्यात गोथे ने लिहिलेल्या ‘आनाक्रायन्स ग्रँब’ या कवितेचा समावेश होतो. तसेच लेकोन्टे डी लिस्ले यांनी ‘ओडसआनाक्राँन्टिकस्’ ही मालिका लिहिली. एडगर लालन पो यांनी ‘रोमान्स’  ही कविता लिहिली. ‘टू आनक्रेन इन हेवन अँड अवर अमाइसेस’ हे कवी ग्रॅहॅम फाउस्ट यांच्या पुस्तकाचे शीर्षक आहे.

संगीत क्षेत्रातही आनाक्रेऑनचा विषय घेऊन अनेकांनी काम केले आहे. फ्रेंच संगीतकार जीन-फिलिप रमॅओ यांनी आनाक्रेऑन या दोन स्वतंत्र ऑपरॅटिक कामांचा विषय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्रगीत, ‘द स्टार – स्पॅन्ड बॅनर’ हे  ‘द आनाक्रिओंटिक साँग’ च्या नादात तयार झाले आहे.