आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ फेदेराश्यों अँतेरनास्योनाल दे ल-ऑतोमोबील Fédération Internationale de l'Automobile |
|
|---|---|
| लघुरूप | एफ.आय.ए. |
| स्थापना | २० जून, इ.स. १९०४ |
| प्रकार | क्रीडा संघटना |
| उद्देश्य | मोटारस्पोर्ट्स |
| मुख्यालय | |
| स्थान | पॅरीस, फ्रान्स |
| सदस्यता | २२२ सदस्य संघटना |
| वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
फेदेराश्यों अँतेरनास्योनाल दे ल-ऑतोमोबील (फ्रेंच: Fédération Internationale de l'Automobile ; लघुरूप: एफ.आय.ए) अर्थात आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ ही संघटना २० जून, इ.स. १९०४ रोजी मोटार शर्यत आयोजक आणि मोटारींमध्ये रुची असणार्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आसोसिआश्यों अँतेरनास्योनाल देस ऑतोमोबील क्लब्स रेकॉनस (फ्रेंच: Association Internationale des Automobile Clubs Reconnus ; लघुरूप: एआयसीर) या नावाने स्थापण्यात आली. विविध मोटार शर्यतींचे संयोजक म्हणून एफ.आय.ए.ची सर्वसामान्यांमध्ये परिचित आहे.
एफ.आय.ए.चे मुख्यालय पॅरीस, फ्रान्स येथील प्लास द ला कोंकोर्द या ठिकाणी आहे. सध्या एफ.आय.ए.मध्ये जगभरातील १२५ देशांमधील २१३ राष्ट्रीय सदस्य संस्था आहेत. ज्याँ तोट हे एफ.आय.ए.चे अध्यक्ष आहेत.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ. (बहुभाषी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |