Jump to content

हुदहुद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुदहुद
शास्त्रीय नाव
(Upupa epops)
कुळ उपूपाद्य
(Upupidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश हुपो (की कॉमन हुपू?)
(Hoopoe')
संस्कृत कठाकु, पुत्रप्रिय
हिंदी खटोला, नवाह

माहिती

[संपादन]

पिवळसर तपकिरी रंगाच्या ह्या पक्ष्याच्या शेपटी , पाठ व पंखांवर काळ्या – पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात .त्याच्या सुईसारख्या लांब चोचीला जमिनीच्या दिशेने मंद बक असतो .याची पटकन लक्षात येणारी आणखी एक खूण म्हणजे डोक्यावरचा शेंडीसारखा तुरा .दचकला हा सर्रकन तुरा फिस्कारतो. नाकतोडे , झुरळे ,टोळ ,मुंग्या .असे सर्व प्रकारचे किडे मटकावणारा हा पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे . विशेषतः तो शेतीला नुकसानकारक किडे खातो .हे पक्षी नदी , ओढे आणि तळ्याच्या अवतीभोवती एकटे किंवा जोडीने वावरतात .नदीकाठच्या किंवा उद्यानामधल्या हिरवळीवर चट्टेरी पट्टेरी अंगरखा नेसलेला पक्षी मान खाली घालून घाईघाईत त्याच्या सुईसारख्या टोकदार चोचीने जमिनीत खोदून तो गांडूळ किड्याचे कोश आणि पीलव शोधत असतो .हा पक्षी फेब्रुवारी ते में दरम्यान झाडाच्या खोडात असलेल्या भोकात किंवा पडक्या घरात छपराखाली असलेल्या सापटीत गबाळ घरट करतो .हुपोच्या घरट्याला विलक्षण दुर्गधी येते . जर आपण घरट्यात डोकावण्याचा प्रयत्न केला तर त्याची पिल्ल घरट्याच्या तोंडाशी येऊन घाणेरड्या वासाच्या विष्ठेच्या पिचकाऱ्या सोडतात .त्यामुळे या पक्ष्याच्या घरट्यात डोकावताना जरा जपून बर का! हा पक्षी प्रत्यक्ष किंवा चित्रात दाखवला आणि मुलांना याचं नाव विचारल की एकच उत्तर येतं ‘सुतार !’ पण हा सुतार पक्षी नाही .उपुपिडी या पूर्णपणे वेगळ्या कुटुंबात त्याचा समावेश होतो .हा पक्षी ‘हु –पो – पो ,हु – पो – पो !,असा आवाज काढतो म्हणून त्याला हुपो म्हणतात .

चित्रदालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

Huppe fasciée MHNT ZOO 2010 11 161 Ouzouer-sur-Trézée.jpg|