Jump to content

हांगुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चोसोंगुल (वरील) व हांगुल (खालील)

हांगुल किंवा चोसोंगुल हे कोरियन भाषेचे मुळाक्षर आहे. उत्तर कोरियादक्षिण कोरिया ह्या कोरियन भाषिक देशांमध्ये हांगुल वापरले जाते. हांगुलची निर्मिती १४४३ साली चोसून साम्राज्यादरम्यान झाली.

हांगुलमध्ये २४ अक्षरे व व्यंजने आहेत. परंतु शब्दामधील अक्षरे एकापाठोपाठ एक् लिहिण्याऐवजी हांगुलमध्ये अक्षरांचे साचे पाडले जातात, ज्यामुळे शब्द लिहायला कमी जागा लागते.

उत्तर कोरियामध्ये कोरियन भाषा केवळ हांगुल वापरून लिहिली जाते तर दक्षिण कोरियामध्ये हांगुलसोबत हांजा ह्या चीनी मुळाक्षराचा देखील आधार घेतला जातो.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत