Jump to content

स्वस्तिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वस्तिक हे हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. स्वस्तिकाचा वापर जगभरातील संस्कृतींमध्ये देखील केला जातो.

this is the sign for goodness

♻ || स्वस्तिक || ♻

आपणास स्वस्तिक या शुभ चिन्हाबाबत शास्त्रोक्त माहिती

स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभप्रतीक आहे. स्वस्तिकचा सुचक अर्थ 'कल्याण असो' असा आहे. स्वस्तिक मध्ये सूर्य, इंद्र, वायु, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रम्हदेव, शिवपार्वती,श्रीगणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो.

शांती,समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास आहे. 

स्वस्तिक गतीचे द्योतक आहे.त्याचे चार  बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णूंचे हात असून त्या चार हातांनी ते चारही दिशांचे पालन व रक्षण करतात. 

स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास , प्रिती, सौंदर्य, आशिर्वाद, कल्याण, शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत.

स्वस्तिकाची आडवी रेघ म्हणजे विश्वाचा विस्तार, आणि उभी रेघ म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे  कारण. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंचे नाभिकमळ असून  श्री ब्रम्हाचे उत्त्पत्तीस्थानआहे. स्वस्तिकामधे एकूण पाच बिंदू असतात, चार बिंदू हे चार रेघांमध्ये आणि पाचवा बिंदू दोन रेघा छेडतात तेथे म्हणजेच मध्यबिंदू.

देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्मपुराणात म्हणले आहे. भारतीय नारींच्या मंगल भावनांचे प्रतिक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य, सर्व दिशांचा सौरभ, मानवी पुरूषार्थाचे प्रेरणाबळ, निर्मितीच्या सहाय्याची  सूचना आणि देश,काळ यांचे मिलन आहे. अश्या विविध अंगांनी नटलेल्या स्वस्तिक या शुभचिन्हास नमस्कार..