Jump to content

साॅलोमन नाॅरथप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साॅलोमन नाॅरथप याने आयु़्ष्याची पहिली ३० वर्षे स्वातंत्र्य उपभोगले. साधे का होईना त्याच्या डोक्यावर छप्पर होते. बायकामुले होती. एके दिवशी त्याचा काहीही दोष नसताना त्याला पकडून नेले आणि पुढची १२ वर्षे तो गुलाम होता. त्याला मिळणारी वागणूक एखाद्या खेचरापेक्षा किंवा घोड्यापेक्षाही हीन होती. मालकाच्या शेतात त्याला राब राब राबावे लागे अणि वर चाबकाचे फटकारे. आणि त्याबद्दल मिळणारा मोबदला शून्य.

गुलामीतून मुक्त झाल्यावर साॅलोमन नाॅरथप अमेरिकाभर गुलामगिरीवर व्याख्याने देत सुटला. एके दिवशी तो कॅनडात गेला आणि त्याच्या सभेत काही गोंधळ झाला. त्यानंतर साॅलोमन कुणालाही दिसला नाही; त्याचे काय झाले ते माहीत नाही. अमेरिकेच्या जनगणनेतही त्याचे नाव नाही.

साॅलोमन नाॅरथप याने आपल्या गुलामगिरीच्या अनुभवांवर लिहिलेले 'ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह' हे पुस्तक अतिशय गाजले. डाॅ. जयंत कुलकर्णी यांनी त्या पुस्तकाचा 'गुलामीची १२ वर्षे' नावाचा अनुवाद केला आहे.

साॅलोमन नाॅरथप यांंच्यावर लिहिलेली (एकूण २६) पुस्तके

[संपादन]
  • Are We Not Sisters and Brothers? Three Narratives of Slavery, Escape and ...(लेखक : Ellen Craft, Mary Prince, and Solomon Northup)
  • Twelve Years a Slave (लेखक : साॅलोमन नाॅरथप)
  • Twelve Years a Slave by Solomon Northup and Thirty Years a Slave by Louis Hughes (L. C. Hughes)
  • 200 Years A Fraud (David Wilson)
  • Uncle Tom's Cabin, Twelve Years a Slave : (कादंबरी, लेखक : Harriet Beecher Stowe and Solomon Northup)
  • Voices Of Freedom : Four Classic Narratives (लेखक साॅलोमन नाॅरथप आणि इतर), वगैरे.