सन कंट्री एरलाइन्स
Appearance
(सन कंट्री एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
सन कंट्री एरलाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. मिनीयापोलिसचे उपनगर मेंडोटा हाइट्स येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीचा मुख्य तळ मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि साउथवेस्ट फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे इतर तळ असलेली ही कंपनी अमेरिका, मेक्सिको आणि कॅरिबियन बेटांमध्ये विमानसेवा पुरवते. याशिवाय सन कंट्री मागणीनुसार चार्टरसेवाही पुरवते.