सदाशिव शिवदे
Appearance
डॉ. सदाशिव सखाराम शिवदे ( जन्म : इ.स. १९३७; - पुणे, ७ एप्रिल २०१८) हे ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे मराठी साहित्यिक होते.
डॉ. शिवदे हे व्यवसायाने पशुवैद्यक होते. इतिहासाच्या आवडीमुळे ते या क्षेत्रातील अभ्यासाकडे वळले. पशुवैद्यक सेवा पुरवितानाच त्यांनी मराठी, इतिहास विषयात एम. ए.ची पदवी घेतली. त्यांनी लिहिलेले 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे' हे छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र प्रसिद्ध आहे. 'माझी गुरे, माझी माणसे' या ग्रामीण जीवनावर आधारित पुस्तकासह त्यांची इतिहासविषयक २६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या मृत्युसमयी त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर होती. भारत इतिहास संशोधन मंडळाचे ते विश्वस्त होते. तसेच महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते.
पुस्तके
[संपादन]- छत्रपती राजाराम ताराराणी (व्यक्तिचित्रण)
- ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा (चरित्र)
- सेनापती धनाजी जाधव (चरित्र)
- परमानंदकाव्यम् (अनुवादक - स.मो. अयाचित, संपादक सदशिव शिवदे)
- श्रीप्रतापदुर्गामाहात्म्यम् (धार्मिक, ऐतिहासिक)
- मराठ्यांची न्यायव्यवस्था (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक डॉ. व्ही.सी. गुणे)
- मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था (अनुवदित, मूळ इंग्रजी लेखक सुरेंद्र सेन)
- मराठ्यांची लष्करी व्यवस्था (अनुवदित, मूळ इंग्रजी लेखक सुरेंद्र सेन)
- महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग १, २.
- माझी गुरे माझी माणसे
- स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे (चरित्र)
- युद्धभूमीवर श्रीशंभूछत्रपती
- महाराज्ञी येसूबाई (चरित्र)
- रणझुंजार : शंभूछत्रपतींच्या समशेरीची गाथा
- शिवपत्नी सईबाई (चरित्रात्मक)
- छत्रपती संभाजीमहाराजांची पत्रे
- सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र)
- दर्याराज कान्होजी आंग्रे
पुरस्कार
[संपादन]- ’ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा’ या पुस्तकासाठी मुंबईतील न.चिं. केळकर ग्रंथालयाचा ‘साहित्य साधना’ पुरस्कार
- बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस’ पुरस्कार (३-६-२०१७)