सदस्य:रुद्रे कूष्णा महादेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मु पोस्ट . पहाडी पारगाव ता. धारूर जि. बीड

कवी 


        *माझी शाळा*

आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!!

                    त्यावर करतो
                    तांब्यानी प्रेस,
                    तयार आमचा
                    शाळेचा ड्रेस!!
                                

खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!!

                 धोतराचं फडकं
                 आमचं टिफीन,
                 खिशात ठेवुन
                 करतो इन!!

करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ?

                मिरचीचा ठेचा
                लोणच्याचा खार,
                हाच आमचा
                पोषण आहार!!
             

रानातला रानमेवा भारी मौज, अनवाणी पाय आमचे शुज!!

                काट्यांच रूतणं
                दगडांची ठेच,
                कसा सोडवायचा
                हा सारा पेच!!

मुसळधार पाऊस पाण्याचा कडेलोट, पोत्याचा घोंगटा आमचा रेनकोट!!

              जुन्या पुस्तकांची
              अर्धी किंमत,
              शिवलेल्या वह्यांची
              वेगळीच गंमत!!

पेन मागता कांडी मिळायची, गाईड मागण्याची भिती वाटायची!!

               केस कापण्याची
               एकच शक्कल, 
               गप्प बसायचे    
               होईपर्यंत टक्कल!!               


     🌹शाळा एक आठवण🌹
                    
             कवी: कूष्णा रुद्रे