शिवसृष्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवसृष्टी म्हणजे शिवरायाच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारित चित्रांचे किंवा शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन. अशा शिवसृष्ट्या महाराष्ट्रात अनेक आहेत. सर्वात पहिली शिवसृष्टी रत्‍नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे उभारली गेली. चिपळूण शहरापासून १४ किमी अंतरावर आणि सावर्डे गावापासून ४ कि.मी.वर सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. यात श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग शिल्परूपात साकार करण्यात आले आहेत.

इतर शिवसृष्ट्या[संपादन]

  • शिवसृष्टी (कायमस्वरूपी प्रदर्शन), अकलूज (सोलापूर जिल्हा). हे प्रदर्शन खरोखरीच प्रेक्षणीय आहे.
  • शिवसृष्टी, आंबेगाब, कात्रजजवळ, पुणे बंगलोर रस्ता (अंशतः पूर्ण; काम चालू आहे) आनंदराव देशपांडे हे या शिवसृष्टीचे मार्गदर्शक व सल्लागार आहेत. प्रकल्पाचा खर्च : >३०० कोटी.
  • शिवसृष्टी उद्यान (जुनी सांगवी, पुणे)
  • शिवसृष्टी (बीडीपीची जागा, चांदणी चौक-पुणे) (प्रस्तावित)
  • शिवसृष्टी (वसाहत) कुर्ला पूर्व, मुंबई
  • शिवसृष्टी (कोथरूड, पुणे - काम चालू)
  • शिवसॄष्टी (डेरवण)
  • शिवसृष्टी तरुण मंडळ, सोलापूर
  • शिवसृष्टी नांदेड (गीता दस्तापुरे यांचा बंगला). बंगल्यात एक कायमस्वरूपी प्रदर्शन आहे.
  • शिवसृष्टी (कचरा डेपो, पौड रस्ता-पुणे) (प्रस्तावित)
  • शिवसृष्टी, प्रतापगडाचा पायथा, सातारा जिल्हा
  • शिवसृष्टी प्रतिष्ठान अवसरी बुदुक (फेसबुकवरचे एक खाते)
  • शिवसृष्टी प्रतिष्ठान, कामोठे (नवी मुंबई); नांदेड; सोलापूर
  • शिवसृष्टी (प्रस्तावित), कोथरूड कचरा डेपो, पुणे
  • शिवसृष्टी (प्रस्तावित),धायरी, पुणे
  • शिवसृष्टी (प्रस्तावित), पाचाड, रायगड जिल्हा
  • शिवसृष्टी (प्रस्तावित), बेळगाव
  • शिवसृष्टी, लांडेवाडी, भोसरी, पुणे जिल्हा (उद्‌घाटन फेब्रुवारी २०१४)
  • शिवसृष्टी (प्रस्तावित), महाड, रायगड जिल्हा
  • शिवसृष्टी (प्रस्तावित), मुंबई-पुणे रस्ता
  • शिवसृष्टी, शिवनेरी (जुन्नर)-उद्‌घाटन १८ फेब्रुवारी २०१४
  • शिवसृष्टी, सांगवी, पुणे : ही शिवसृष्टी शिव-जिजाऊ उद्यानात उभारली आहे. या कायमस्वरूपी प्रदर्शनाचे उद्‌घाटन ३-११-२०१२ला झाले. या शिवसृष्टीत, शिवाजीच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे १८ महत्त्वाचे प्रसंग आकर्षकरीत्या उभारण्यात आले आहेत. त्यांत शिवाजीची हत्तीवरून मिरवणूक, सोन्याचा नांगर, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग, संत तुकारामाच्या कीर्तनाला लावलेली उपस्थिती, आग्रा दरबारातील प्रसंग, अटक व सुटका, जिजाबाईंची सुवर्णतुला आदी प्रसंग आहेत.
  • शिवसृष्टी - साल्हेर किल्ला परिसरात (प्रस्तावित)

या सृष्ट्यांखेरीज महाराष्ट्रात आणखीही काही सृष्ट्या आहेत. त्या अशा :

  • चिंचवडगाव येथील पार्वती उद्यानात मोरया (गोसावी) सृष्टी उभारण्यात आली आहे.
  • जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा
  • जिजाऊ सृष्टी सिडको, नांदेड
  • भीमसृष्टी, पिंपरी (पायाभरणी ७-७-२०१६ रोजी, अपेक्षित सरकारी खर्च ५ कोटी रुपये)
  • संभाजी सृष्ट्या (प्रस्तावित), जळगाव; अकलूज
  • सावित्रीमाई सृष्टी (प्रस्तावित)
  • हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी
  • मराठी नाट्यसृष्टी

पहा[संपादन]

शिवाजी नावाच्या संस्था

बाह्य दुवे[संपादन]